सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या लुडबुडीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:30+5:30

सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत आजही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. विशेष म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकांना कागदपत्र घेऊन बोलाविले व सभा घेतली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.

A hammer on a retired officer's lap | सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या लुडबुडीवर गदा

सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या लुडबुडीवर गदा

ठळक मुद्देमुकाअंनी उचलले पाऊल : त्या बैठकीला घेऊन अभियंता व लिपिकाचा घेतला समाचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सेवानिवृत्ती नंतरही जिल्हा परिषदेच्या कारभारात लुडबुड करीत असलेल्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हरकतींवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी गदा आणली आहे. डॉ. दयानिधी यांनी याप्रकरणी लगेच पाऊल उचलले असून जिल्हाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त अधिकाऱ्याने घेतलेल्या बैठकीला घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाचा समाचार घेतल्याची माहिती आहे.
सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत आजही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. विशेष म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकांना कागदपत्र घेऊन बोलाविले व सभा घेतली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच मुकाअ. डॉ. दयानिधी यांनी लगेच बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाला बोलावून त्यांचा समाचार घेतला. सेवानिवृत्त अति. मुकाअ यांच्याकडे प्रशासकीय कागदपत्रे का नेण्यात आली अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याचप्रमाणे सध्या करोना संसर्गाच्या काळात शासनाने फक्त ३३ टक्के कामांनाच मंजुरी दिली असून ते सुद्धा आवश्यक असल्यास असे स्पष्ट निर्देश असताना बांधकाम सभापतींनी १०० टक्के कामांचे वितरण करुन टाकले. त्या कामाच्या वितरणात सेवानिवृत्त अतिरिक्त मुकाअ यांची महत्त्वाची भूमिका असून ही सर्व कामे ३१ मार्च पुर्वी दाखिवण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असून सेवानिवृत्तीनंतर त्याकरीताच अति.मुकाअ हे गोंदियात तळ ठोकून बसल्याची चर्चा कंत्राटदार वर्गासह जिल्हा परिषदेत सुरु आहे. या सर्व प्रकरणात डॉ.दयानिधी यांनी ३३ टक्केवर कुठल्याच कामांना मंजुरी नाही असे सांगत मुख्य लेखा अधिकाºयांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याशिवाय उपविभागातंर्गत असलेले अभियंता टेंभुर्णीकर यांच्याकडे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसह निवासस्थानांचे काम सोपविण्यात आले होते. मात्र त्यांनी जानेवारी २०२० मध्येच या कामाचा प्रभार सोडल्याने सध्या कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व अभियंता अशी तिन्ही कामे एकाच अधिकाºयाला पार पाडण्याची वेळ आली आहे. यावरुन अभियंते मनमर्जीने काम करु लागले की त्यांनी मार्च ३१ रोजी सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त मुकाअच्या जाचाला कंटाळून जानेवारीमध्येच मुख्यालय अभियंत्याचा पदभार सोडला या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एंटीचेबरच्या दुरुस्तीसह रंगरगोंटीचे तीन लक्ष रुपयांचे काम करण्यात आले. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून प्रशासकीय मान्यतेनुसार लागणाऱ्या गोष्टी तिथे लागल्या नसून सुमारे दोन लाखांवर त्या कामात खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र देयके पूर्ण तीन लाखांचे निघाल्याचे वृत्त आहे. असाच प्रकार अनेक कार्यालयांत सध्या सुरु आहे. तर मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या कार्यालयाच्या कक्षाचे सुद्धा नुतनीकरणाचे काम दीड वर्षातच केले जात असून या कामाची सुरवात झाली असली तरी त्या कामाला प्रशासकीय मान्यता आहे की नाही याबाबत शंकांना पेव फुटले आहे.

Web Title: A hammer on a retired officer's lap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.