पालकमंत्र्यानी दिले मामा तलाव दुरुस्तीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:12 IST2018-11-18T01:12:04+5:302018-11-18T01:12:27+5:30

पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करुन तलावाची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले.

Guidelines for repair of Mama Lake municipality | पालकमंत्र्यानी दिले मामा तलाव दुरुस्तीचे निर्देश

पालकमंत्र्यानी दिले मामा तलाव दुरुस्तीचे निर्देश

ठळक मुद्देनिंबा येथील मामा तलाव : अनेक दिवसांपासूनची समस्या मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा : पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करुन तलावाची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्याच्या निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची दुदर्शा झाली असून तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे केली होती.
त्यानंतर बडोले यांनी याची दखल घेत निंबा येथील तलावाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता टाले व कार्यकारी अभियंता चौधरी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन मामा तलावाची त्वरीत दुरूस्ती करण्यास सांगितले. तसेच या वेळी निंबा परिसरातील इतर समस्यांचा आढावा घेतला.
या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, प्रसिध्दी बुधराम बिजेवार, तांत्रिक अधिकारी विजय पटले, दुलीचंद रहांगडाले, रमेश पंधरे, योगराज ठाकरे, शालीकराम चोरवाडे, शोभेलाल पंधरे, विष्णू पुसाम व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Guidelines for repair of Mama Lake municipality