पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By Admin | Updated: March 31, 2016 02:12 IST2016-03-31T02:12:08+5:302016-03-31T02:12:08+5:30

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी

Guardian minister should resign | पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारला ओबीसी समाजाबद्दल असामाजिक अपशब्द उद्गारले त्यांनी जाहीर माफी मागून त्यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन ओबीसी संघर्ष समितीने मंगळवारी प्रभारी उपविभागीय अधिकारी डी.सी. बोम्बर्डे यांना दिले. निवेदनाच्या प्रती राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
ना. बडोले यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याचे ओबीसी समाज संघटनांचे म्हणणे आहे.
राज्यघटनेच्या ३४० कलमात अनुच्छेद तयार करून ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय व ओबीसी आयोगाची निर्मिती करावी ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी १० मे २०१० रोजी संसदेत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्राप्रमाणे शंभर टक्के फ्रीशीपची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागात ओबीसीसाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उध्दव मेहंदळे, विजयसिंह राठौड, भोजराम रहिले, टिकाराम बोरकर, राकेश लंजे, प्रमोद पाऊलझगडे, कांता पाऊलझगडे, मनोहर शहारे, देवीका हातझाडे, कृष्णकांत खोटेले, शालीकराम हातझाडे, भागवत नाकाडे, मानिक घनाडे, चेतन शेंडे, इंद्रदास झिलपे व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Guardian minister should resign