वाढत्या गर्दीने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:08+5:30

अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राज्य शासनाकडूनच सुट दिली जात असल्याने नागरिकही ठरवून दिलेल्या काही अटी-शर्तींना विसरून मोकाट वागत आहेत.

The growing crowd increased the danger | वाढत्या गर्दीने धोका वाढला

वाढत्या गर्दीने धोका वाढला

ठळक मुद्देकोरोना रूग्ण संख्येत वाढ : गर्दी टाळणे झाले गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवरात्रोत्सवामुळे एकीकडे गर्दी वाढत असतानाच आता कोरोनाचाही धोका वाढू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात असतानाच मागील ४ दिवसांपासून मात्र पुन्हा रूग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे वाढती गर्दी धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे. अशात गर्दी टाळणे व आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन करणे अत्यावश्यक झाले आहे.
अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राज्य शासनाकडूनच सुट दिली जात असल्याने नागरिकही ठरवून दिलेल्या काही अटी-शर्तींना विसरून मोकाट वागत आहेत.
परिणामी कोरोनाचा कहर आहे तसाच दिसून येत असून झपाटया रूग्ण संख्या वाढत चालली आहे.
जिल्ह्यातील चित्र बघता आजघडीला ८३९७ एवढी कोरोना रूग्ण संख्या झाली असून जिल्ह्यात ७७६ क्रियाशील रूग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात होती. त्यातही कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने जास्त असल्याने क्रियाशील रूग्णांची संख्या झपाटयाने कमी झाली आहे.
मात्र आता नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. हेच कारण आहे की, कोरोना जिल्ह्यात पुन्हा आपले पाय पसरत असल्याने मागील ४ दिवसांपासून दिसून येत आहे.
ही स्थिती बघता उत्सवाच्या भरात होणारी गर्दी धोकादायक ठरणार असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात निर्माण झालेली स्थिती पुन्हा निर्माण होणार यात शंका वाटत नाही. करिता आता गर्दी टाळणे अत्यावश्यक झाले आहे. शिवाय शासनाने ठरवून दिलेल्या उपाययोजनांचे पालन करणे फायद्याचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती आहे. हेच कारण आहे की, शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सवाच्या साहित्यांनी सजली आहे. या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी आता बाजारपेठेत दिसून येत आहे. अशात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा व सॅनिटायजरचा वापर याकडे दुर्लक्षही होत आहे.

Web Title: The growing crowd increased the danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.