गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली सहविचार सभा

By Admin | Updated: May 14, 2014 01:50 IST2014-05-12T23:53:07+5:302014-05-14T01:50:58+5:30

तिरोडा पंचायत समितीे गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी विविध विषयासंदर्भात तीन केंद्रांच्या सहविचार सभेचे आयोजन ग्राम करटी बुज. येथील जिल्हा परिषद विद्यालयात नुकतेच केले होते.

The Group Education Officer took the discussion meeting | गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली सहविचार सभा

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली सहविचार सभा

काचेवानी : तिरोडा पंचायत समितीे गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी विविध विषयासंदर्भात तीन केंद्रांच्या सहविचार सभेचे आयोजन ग्राम करटी बुज. येथील जिल्हा परिषद विद्यालयात नुकतेच केले होते. यात आयकर ऑनलाईन करुन सीडी तयार करणे, येणार्‍या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंना गणवेश देणे यासह अन्य विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी मांढरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सहविचार सभेला वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी. साकुरे, करटी केंद्राच्या केंद्रप्रमुख आर.बी. दास, परसवाडाच्या केंद्रप्रमुख खोब्रागडे, गोंडमोहाळीचे केंद्रप्रमुख मेश्राम, विषयतज्ज्ञ मिश्रा, करटी विद्यालयाचे मुख्याध्यापक मेश्राम आणि सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. सभेत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचा पॅन नंबर वेगळा झाला असल्याने आयकर परिगणना, रिटर्न, सोळा नंबर फार्म आदी कारवाई वेळेत व्हावी, पारदर्शकता असावी यावर मांढरे यांनी चर्चा केली. तर याची अंमलबजावणी तातडीने व्हावी याकरिता केंद्र स्तरावर शिक्षकांच्या सभा घेवून मांढरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

करटी, परसवाडा आणि गोंडमोहाळी या तीन केंद्राची सहविचार सभा घेवून आयकर संबंधी माहितीची ऑनलाईन करणे, दोन वर्षाची सी.डी. तयार करणे यावर मार्गदर्शन करीत हि सर्व कामे शिक्षकांनाच करावयाची आहेत असेही गट शिक्षणाधिकारी मांढरे यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले.

एवढेच नव्हे तर, आयकर गणना रिटर्न, सोळा नंबर नमूना फार्म वेळेत करण्यात आले नाहीत तर प्रतिदिवसाप्रमाणे दंड आकारणी केली जाऊ शकते. याकरिता आयकर संबंधी वेळेत संपूर्ण कामे होणे गरजेचे आहे. ज्याच्यावर टॅक्स बसतो त्याला १६ नंबर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर ज्याच्यावर बसत नाही त्याला ऑफ लाईन करावा लागतो. याकरिता सर्व शिक्षकांनी दोन वर्षाची सीडी तयार करुन ऑनलाईन करुन घेण्याचा सल्ला गट शिक्षणाधिकारी मांढरे यांनी उपस्थित शिक्षकांना दिला .

या सहविचार सभेचे संचालन शिक्षक लच्छू ढबाले यांनी केले . तर आभार पारधी यांनी मानले. सभेला करटी, परसवाडा व गोंडमाहोळी केंद्रातील मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांसह शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: The Group Education Officer took the discussion meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.