शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आजीची एकदाणी केली नातवाच्या सुपुर्द ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

गोंदिया : सन १९९१ मध्ये चोरीला गेलेली एकदाणी पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केली. मात्र, त्यानंतर फिर्यादी महिलेचे निधन झाले व ...

गोंदिया : सन १९९१ मध्ये चोरीला गेलेली एकदाणी पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केली. मात्र, त्यानंतर फिर्यादी महिलेचे निधन झाले व एकदाणी पोलीस ठाण्यातच पडून राहिली. मात्र, प्रलंबित मुद्देमाल निर्गतीच्या विशेष मोहिमेंतर्गत डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी माहिती काढून ती एकदाणी फिर्यादी महिलेच्या नातवाच्या सुपुर्द केली.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या निर्देशानुसार प्रलंबित मुद्देमाल निर्गतीची विशेष मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत आपल्या पोलीस ठाण्यात असलेल्या किमती मुद्देमालाची निर्गती करण्याबाबत ठाणेदार वांगडे यांनी रेकॉर्डची तपासणी केली. यात त्यांना सन १९९१ मध्ये फिर्यादी फुलनबाई गेंदलाल मडावी (रा. सितेपार) यांच्या तक्रारीवरून दाखल असलेला गुन्हा क्रमांक ६३-१-९१ कलम ३८० भादंविमधील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली सोन्याच्या ४० मण्यांची एकदाणी ही निकालाअंती पोलीस ठाण्यात मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे आढळले. यावर ठाणेदार वांगडे यांनी मुद्देमाल प्रलंबित असल्याचे कारण पाहून व जुने अभिलेख तपासून शहानिशा केली. यात त्यांना गुन्हा निकाली निघालेला असून गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीने परत नेला नसल्याने माल प्रलंबित असल्याचे कळले. यावर ठाणेदार यांनी गुन्ह्यातील फिर्यादी फुलनबाई मडावी यांचा शोध घेतला असता त्यांचा मृत्यू झाला असून वारसदार नातू बाळकृष्ण सीताराम मडावी (रा. सितेपार) हे असल्याचे सिद्ध झाले. अशात बाळकृष्ण मडावी यांना पोलीस ठाण्यात बोलावून अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (देवरी) जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वांगडे यांच्या हस्ते न्यायालयीन सूचनेनुसार कायदेशीररीत्या ती एकदाणी सुपुर्द करण्यात आली. ही कारवाई रायटर पोलीस हवालदार चौधरी व शिपाई भोयर यांनी केली.