ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:47+5:302021-01-13T05:15:47+5:30

गावातून फिरणाऱ्या प्रचारपद्धतीला बगल देत ॲन्ड्राॅईड मोबाईलद्वारे व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रचार करणे जोरात सुरू झाले आहे. आपापली उमेदवारी गावाच्या विकासासाठी ...

The Gram Panchayat elections were in full swing | ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

गावातून फिरणाऱ्या प्रचारपद्धतीला बगल देत ॲन्ड्राॅईड मोबाईलद्वारे व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रचार करणे जोरात सुरू झाले आहे. आपापली उमेदवारी गावाच्या विकासासाठी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुण सुशिक्षित वर्ग निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ॲन्ड्रॉईड व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे. आपल्या जवळचा कोण आणि दूरचा कोण, या अंदाजाला दूर सारत प्रत्येकाने आपल्या चिन्हासह व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. आपापल्या वाॅर्डातील मतदारांची संख्या जोडून निवडणुकीत निवडून येण्याच्या खात्रीने सामाजिक संबंधाचेसुध्दा गणित जोडत आहेत. आम्ही फक्त गावविकासाकरिता ग्रामपंचायत निवडणूक लढवीत असल्याची भूमिका व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शहराप्रमाणे खेड्यातसुध्दा सर्वाच्या हातात मोबाईल आल्यामुळे अनेक उमेदवारांना आपला प्रचार करणे सोपे झाले आहे. जसजसी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसतसा निवडणूक प्रचाराला वेग येत असून काही राजकीय मंडळी या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणत्या वाॅर्डातील कोण उमेदवार निवडून येईल यांचा अंदाज बांधत आहेत. सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने कोणताही उमेदवार फारसा खर्च करताना दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये होणाऱ्या अमाप खर्चावर आळा बसला आहे. निश्चित खर्च करण्यासंदर्भात मागेपुढे बघत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The Gram Panchayat elections were in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.