दाभना येथे शासकीय सेवेत रूजू युवकांचा सत्कार (झेंडा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:42+5:302021-08-18T04:34:42+5:30

त्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणानंतर गावातील शासकीय सेवेत रूजू झालेल्या बिपीन मोरेश्वर मेश्राम आणि भावेश हरिराम सूर्यवंशी यांचा ग्रामपंचायत सरपंच ...

Government service at Dabhana felicitates youth (flag) | दाभना येथे शासकीय सेवेत रूजू युवकांचा सत्कार (झेंडा)

दाभना येथे शासकीय सेवेत रूजू युवकांचा सत्कार (झेंडा)

त्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणानंतर गावातील शासकीय सेवेत रूजू झालेल्या बिपीन मोरेश्वर मेश्राम आणि भावेश हरिराम सूर्यवंशी यांचा ग्रामपंचायत सरपंच रहिले, उपसरपंच चरणदास घासले यांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. १ एप्रिल ते १३ ऑगस्ट या कालावधीत ज्या नागरिकांनी ग्रामपंचायत कराचा भरणा पूर्णतः केला. अशा नागरिकांचा ईश्वर चिठ्ठीने रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये शकुंतला मोतीराम ब्राह्मणकर, व्दितीय एक हजार ५०० रुपये मीरा देवदास प्रधान व तृतीय पारितोषिक एक हजार रुपये सुनील शिवा प्रधान यांना देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुंभरे, जगन मेश्राम, गीता प्रधान, वनीता मानकर, रेवता पीहीदे, प्रतिभा ब्राह्मणकर, ग्रामसेविका चित्रा बागडे, तंमुस अध्यक्ष अरविंद गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक मानकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Government service at Dabhana felicitates youth (flag)