शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

शासकीय धान खरेदी होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM

सध्या खरीप हंगामातील धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुरू आहे. या दोन्ही विभागानी आत्तापर्यंत ३० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दररोज ५० ते ७० हजार क्विंटल धानाची आवक सुरू आहे. फेडरेशनने आत्तापर्यंत खरेदी केलेल्या २१ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत केवळ ७ लाख ७१ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे.

ठळक मुद्दे१४ लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली : दररोज ५० हजार क्विंटल धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या मागील वर्षीच्या ६० हजार मेट्रीक टन तांदळाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी यावर्षी भरडाई केलेला १० लाख क्विंटल तांदूळ ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या चार पाच दिवसात या धानाची उचल न झाल्यास शासकीय धान खरेदी ठप्प होणार आहे.सध्या खरीप हंगामातील धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुरू आहे. या दोन्ही विभागानी आत्तापर्यंत ३० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दररोज ५० ते ७० हजार क्विंटल धानाची आवक सुरू आहे.फेडरेशनने आत्तापर्यंत खरेदी केलेल्या २१ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत केवळ ७ लाख ७१ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर जवळपास १३ लाख क्विंटल धान भरडाईअभावी शासकीय धान खरेदी केंद्रावर तसाच पडून असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. त्यानंतर राईस मिलर्स धानाची भरडाई करुन सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यानंतर या धानाची गोदामांमध्ये साठवणूक केली जाते. साठवणूक केलेला तांदूळ शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर विविध जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानादारांना पुरवठा केला जातो.गोंदिया येथे ६० हजार मेट्रीक टन क्षमतेचे तांदळाचे गोदाम आहे. मात्र अद्यापही या गोदामांमध्ये मागील वर्षीचा ६० हजार मेट्रीेक टन तांदूळ तसाच पडला आहे. याची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला एकूण २५१५ रुपये दर मिळत असल्याने केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे.अशीच आवक सुरू राहिल्यास ३० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होण्याची शक्यता फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मात्र जोपर्यंत केंद्रावरील आणि गोदामातील धानाची उचल केली जात नाही. तोपर्यंत खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे त्यामुळे धानाची उचल होईपर्यंत धान खरेदी बंद ठेवण्यासाठी गुरूवारी मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांचे विचार मंथन सुरू होते.तांदळाची उचल न होण्याचे कारण गुलदस्त्यातजिल्ह्यात ६० हजार मेट्रीकटन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र या गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश अद्यापही शासनाकडून प्राप्त झालेले नाही.त्यामुळे भरडाई केलेला तांदूळ आणि खरेदी केलेला १४ लाख क्विंटल धान ठेवायचा कुठे असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तांदळाची उचल करण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.जिल्हा प्रशासनाची बघ्याची भूमिकाभरडाईसाठी धानाची खरेदी केंद्रावरुन उचल न झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. धान खरेदी बंद करण्याची वेळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर आली असताना अद्यापही जिल्हा प्रशासनाने यावर कुठलाच तोडगा काढला नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड