शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध

By admin | Updated: February 25, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यासाठी विविध योजना आणत केंद्र सरकारने कृषी बजेट मांडला.

नाना पटोले : खराडी येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन खरबी (नाका) : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यासाठी विविध योजना आणत केंद्र सरकारने कृषी बजेट मांडला. यावर्षी भारत सरकारने १० लाख कोटी रूपये नाबार्ड बँकेला देऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी मदत केली, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. खराडी येथील जय बजरंगबली क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर जवाहरनगरचे ठाणेदार वाय.एस. किचक, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, चंद्रप्रकाश दुरुगकर, आकाश कोरे, पंचायत समिती सदस्य अमीत वसानी, माजी जिल्हा परिषद सदस्या निता आकरे, सरपंच संजय हिवसे, गोवरीचे उपसरपंच अंकीत वाडीभस्मे, राजेदहेगावचे सरपंच रामचंद्र लेंडे, रवि आगाशे, सुमीत गिऱ्हेपुंजे, ग्रामपंचायत सदस्या माया हिवसे, रविता वरखडे, दुर्वास हिवसे उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, खराडी या गावाशी माझे नाते आहे. या गावाने मला १०० टक्के मतदान केले होते. या गावातील समस्या पूर्ण करणार आहे. वाय.एस. किचक म्हणाले, कबड्डी खेळामुळे आज अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. अनेक खेळाडू नोकरीवर लागत आहेत. प्रेम वनवे म्हणाले, खराडी या गावाच्या विकासासाठी मी जिल्हा परिषदेतर्फे हे गाव दत्तक घेतले असून या गावाच्या विकासाची जबाबदारी घेत आहे. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे प्रात्यक्षिक कला पथकातून मांडण्यात आले. या मध्ये बेटी पढाओ, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, हागनदारीमुक्त गाव, सुकन्या योजना, पिक विमा योजना, घरकुल योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री विमा योजना अशा अनेक योजनांचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पुंडलीक हिवसे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चैतराम हिवसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच संजय हिवसे यांनी केले. संचालन चंद्रकांत मोथरकर, आभारप्रदर्शन पुंडलीक हिवसे यांनी केले. कार्यक्रमासाठी दिपक बांगर, राकेश कारेमोरे, पंकज कारेमोरे, गुंडेराव हिवसे, विजय हिवसे व समस्त गावकरी व जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी केले. (वार्ताहर)