शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:18 AM

नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षात पथकाच्या ५८३ फेऱ्या : नादुरूस्त असलेली ४३ हजार २४८ शौचालये झाली सज्ज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वात जास्त दंड तिरोडा तालुक्यातील लोकांना बसला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत होते. निर्मल ग्राम किंवा निर्मल जिल्हा करण्याच्या नादात जिल्ह्यात ओबड-धोबड शौचालय तयार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २२५ शौचालय नादुरूस्त होते. ते नादुरूस्त शौचालय दुरूस्त करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत होता. परंतु तो निधी शासनाने देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा परिषदेने मागील दिड वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ४३ हजार २४८ शौचालय तयार करण्यात आले आहे.नादुरूस्त असलेले शौचालय सुरू करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करून एवढे शौचालय सुरू करणारा गोंदिया जिल्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा आहे. ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत ५८३ फेऱ्या गुडमॉर्निंग पथकाने मारल्या. यासाठी तालुकास्तरावर १६ गट पाडण्यात आले होते. गुडमॉर्निंेग पथकाच्या जनजागृतीमुळे २१ हजार ३४७ शौचालय लोकांनी स्वयंस्फूर्तीने बांधले आहेत. शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड ही करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. इतकेच नव्हे तर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. लोकांना शौचालयाचे महत्व पटवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी बाध्य करण्यात आले.गृहभेटीही ठरल्या प्रभावीशौचालयाचा वापर न करणाºया किंवा ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा २३ हजार ६०८ लोकांच्या घरी स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या लोकांनी भेटी दिल्या. एवढ्या घरांच्या भेटी ४६८ अधिकारी-कर्मचाºयांनी केल्या आहेत. या गृहभेटीची फलश्रृती म्हणजे १४ हजार ५६ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले आहेत. यासाठी १६ ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ३१ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १३१ शिबिर जिल्ह्यात घेण्यात आले. या शिबिरात ३१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनीही शौचालय किती महत्वाचे आहे हे शिबिराच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले.१.८० लाख महिलांना वाणातून स्वच्छतेचा संदेशगोंदिया जिल्ह्यातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाणातून १ लाख ८० हजार महिलांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहचविण्यात आले. १ हजार ७९७ आंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जनजागृती करण्यात आली. वाण म्हणून पतंजलीकडून १ लाख ७३ हजार साबण दिल्या. जिल्हा परिषद कडून वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचे जनमाणसात चर्चा आहे.शौचालयासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये देऊन शौचालयाचे बांधकाम करणे अवघड नाही. मात्र नादुरूस्त शौचालय तयार करणे अत्यंत अवघड होते. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून ते शौचालय तयार करण्याचे कार्य जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले. विशेष म्हणजे, याची दखल केंद्रस्तरावर घेण्यात आली आहे.-राजेश राठोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी व स्वच्छता जि.प. गोंदिया.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान