गूड न्यूज। तब्बल २८२ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:07+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र काही केल्या बंद होत नसल्याचे दिसत आहे. शनिवारीही २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १०४ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६२, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ६, सालेकसा २, देवरी २, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व इतर ठिकाणच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.

गूड न्यूज। तब्बल २८२ रुग्ण कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिन्यात कोरोना रूग्णांचा आकडेवारीचा दररोज स्फोट असल्याचे दिसून आले. मात्र ऑक्टोबर महिन्याची सुरूवात जिल्हावासीयांसाठी दिलासादायक असून नवीन बाधित रूग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची आकडेवारी जास्त येत आहे. शनिवारी (दि.३) जिल्ह्यातील २८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून ९६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मात्र आणखी २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात १६४८ क्रीयाशील रूग्णसंख्या झाली आहे.
शनिवारी (दि.३) आढळून आलेल्या ९६ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६५, तिरोडा ६, गोरेगाव २, आमगाव २, सालेकसा १, देवरी ८, सडक-अर्जुनी ६ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७६४७ झाली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३१८, तिरोडा ९९४, गोरेगाव ३१८, आमगाव ४५८, सालेकसा ३४८, देवरी २८३, सडक-अर्जुनी २५१, अर्जुनी-मोरगाव २८८ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ८९ रुग्ण आहेत.
शनिवारी (दि.३) २८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १८०, तिरोडा ६१, गोरेगाव ८, आमगाव ८, सालेकसा ६, देवरी ४, सडक-अर्जुनी ७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ५५९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३४२२, तिरोडा ७५०, गोरेगाव २२६, आमगाव ३२९, सालेकसा १६८, देवरी १८०, सडक-अर्जुनी २०१, अर्जुनी-मोरगाव २३९ आणि इतर ८० रुग्णांचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १६४८ झाली आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील ८३४, तिरोडा २२९, गोरेगाव ८९, आमगाव १२३, सालेकसा १७८, देवरी १०१, सडक-अर्जुनी ४७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४७ रूग्ण क्रियाशील आहेत.
५६६ रूग्ण घरीच अलगीकरणात
जिल्हयातील क्रीयाशीला रूग्णांपैकी ५६६ रुग्ण घरीच अलगीकरणात असून यात गोंदिया तालुक्यातील २६९, तिरोडा ५६, गोरेगाव ५२, आमगाव २५, सालेकसा ७१, देवरी ४४, सडक-अर्जुनी ९, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४० रूग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत १०४ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र काही केल्या बंद होत नसल्याचे दिसत आहे. शनिवारीही २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १०४ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६२, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ६, सालेकसा २, देवरी २, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व इतर ठिकाणच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.