मत्स्यपालन संस्थांना येणार ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: October 18, 2015 02:11 IST2015-10-18T02:11:21+5:302015-10-18T02:11:21+5:30

गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत.

'Good day' will be done for fisheries organizations | मत्स्यपालन संस्थांना येणार ‘अच्छे दिन’

मत्स्यपालन संस्थांना येणार ‘अच्छे दिन’

नाव होणार जिल्ह्याचे : पटोले यांचे आश्वासन
बाराभाटी : गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १२६ संस्था कार्यरत आहेत. ९१५० सभासद या व्यवसायावर आपले जीवन जगत आहेत. त्यांच्या मागण्यांवर खा.नाना पटोले यांनी सकारात्मत प्रतिसाद दिला.
तलावातून भरघोष मत्स्योपादन होत नाही. याचे कारण संस्थेकडे तुटपुंजे असलेले भांडवल, तलावांचे न झालेले खोलीकरण, वाढलेला कचरा, शासनाकडून मिळणारी अपुरी मदत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा अनेक समस्यांनी ग्रस्त अशा या मत्स्योद्योगाला शासकीय मदतीची गरज आहे. ज्याप्रमाणे शासन विविध उद्योगाला सोयी, सवलती देतो त्यानुसारच मत्स्योद्योगाला सोयी, सवलती प्रदान केल्या तर गोंदिया जिल्हा भाताचा, तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उद्या हाच जिल्हा गोड्या पाण्यातील मास्यांचा जिल्हा म्हणून नावारुपास येईल.
बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील मत्स्य पालन संस्थाची सभा घेण्यात आली. सभेला खा. नाना पटोले उपस्थित होते. मत्स्य उद्योगाला नवसंजीवनी प्रदान करुन उद्योगाला भरभराटीस कसे नेता येईल यासाठी त्यांनी आश्वासने दिली. ते आश्वासन कृतीत आणण्याचे अभिवचन दिले.
जि.प.चे तलाव म.पा.संस्थालाच पूर्वीप्रमाणे देण्यात येतील. त्यात कसलाही फेरबदल केला जाणार नाही. २०० हेक्टरचे वर असलेल्या तलावाचे लिलाव न करता कार्यक्षेत्रातील संस्थेलाच देण्यात येतील.
अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई उरलेल्या संस्थाना देण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक संस्थांना सदस्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल. जि.प. व पाटबंधारे तलाव आरक्षण पद्धतीने संस्थेलाच मिळतील. भविष्यात संस्थाकडून लिज घेणार नसल्याचे धोरण शासनाचे असल्याचे खा. नाना पटोलें यांनी सांगितले. चोरखमारा, चुलबंद व कटंगी जलाशय यांचे ओपण लिलाव झाले. परंतु यापुढे ते संस्थेलाच देण्यात येतील असे आवार्जून सांगितले.
सभेला सुरगाव संस्थेचे अध्यक्ष दिलवर रामटेके, कोटरा संस्थेचे अध्यक्ष विनोद मेश्राम, हनुजी हुमने, बोंडगावदेवीचे अध्यक्ष ताराचंद मेश्राम, कालिदास बावने, दिघोरे, कोल्हे असे १२० सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Good day' will be done for fisheries organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.