गोंदियातील सारस होणार ग्लोबल

By Admin | Updated: December 19, 2015 01:44 IST2015-12-19T01:44:53+5:302015-12-19T01:44:53+5:30

‘सारस फेस्टीवल’अंतर्गत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय फोटो शूट स्पर्धेबाबत जस-जशी माहिती मिळत आहे, ..

Gondiya Saras will be Global | गोंदियातील सारस होणार ग्लोबल

गोंदियातील सारस होणार ग्लोबल

फोटोशूट स्पर्धेला प्रारंभ : हौशी छायाचित्रकारांना ओढ, परराज्यातूनही प्रतिसाद
गोंदिया : ‘सारस फेस्टीवल’अंतर्गत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय फोटो शूट स्पर्धेबाबत जस-जशी माहिती मिळत आहे, तस-तसे हौशी छायाचित्रकारांकडून जिल्हा पर्यटन समितीला फोन येत असून त्याची नोंदणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी परराज्यातील छायाचित्रकारांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गोंदियातील सारसांचा महिमा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची आशा पल्लवित झाली आहे.
जिल्ह्याला लाभलेल्या जल, जंगल व जीव या तिघांचा मेळ घालून या जंगल व जीवसृष्टीचे संवर्धन व रोजगार निर्मितीतून गोंदिया जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे राज्यात फक्त गोंदिया जिल्हयातच ‘सारस’ हा पक्षी आढळत असल्याने दुर्मिळ सारसांचे सर्वांनाच आकर्षण आहे. सध्याचा काळ हा देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाचा काळ असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा पर्यटन समितीकडून ‘सारस फेस्टीवल’चे आयोजन करण्याची कल्पना प्रत्यक्ष साकारण्यात आली.
१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी असा दीड महिन्याचा हा महोत्सव असून जिल्ह्यासह अन्य जिल्हेच नाही तर राज्यांतील छायाचित्रकारांना जिल्ह्यात खेचून आणावे या उद्देशातून फोटो शूट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देश पातळीवर कुणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकत असल्याने ही एक राष्ट्रीय फोटोशूट स्पर्धा ठरत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच फोटोग्राफर्स आणि सर्वत्र निसर्ग व वन्यजीव संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच येथील पक्षी, वन्यजीव व निसर्गप्रेमींच्या माध्यमातूनही फोटोग्रासर्फना संपर्क साधला जात आहे. त्यामुळे परराज्यातूनही या स्पर्धेसाठी नोंदणी होत असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Gondiya Saras will be Global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.