शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियावासीयांचा पावसाळा ब्लिचिंग पावडरविनाच

By admin | Updated: September 22, 2014 23:20 IST

गोंदिया शहरात मागील महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्याने नागरिकांनी नगर परिषदेला त्रस्त करून सोडले. नगर परिषदेने निविदा काढून ब्लिचिंग पावडरसाठी कंत्राटदाराकडून अर्ज मागीतले होते.

गोंदिया : गोंदिया शहरात मागील महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्याने नागरिकांनी नगर परिषदेला त्रस्त करून सोडले. नगर परिषदेने निविदा काढून ब्लिचिंग पावडरसाठी कंत्राटदाराकडून अर्ज मागीतले होते. परंतु एकही अर्ज न आल्यामुळे सन २०१३-१४ मध्ये कंत्राट असलेल्या व्यक्तीकडूनच ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यात आल्याचे न.प.च्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले. परंतू पावसाळ्याच्या एक महिन्याभरापेक्षा जास्त कालवधीत ब्लिचिंग पावडर नसल्यामुळे दूषित पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागला.गोंदिया शहराला एका वर्षात ५० पोती ब्लिचिंग पावडरची गरज असते. एका पोत्यामध्ये २५ किलो ब्लिचिंग पावडर असते. यावर्षी जुलै महिन्यात नगर परिषदेने ब्लिचिंग पावडरसाठी निविदा काढल्या होत्या. परंतु निविदेसाठी एकही अर्ज आला नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे. त्यामुळे नगर परिषदेला नागरिकांची ओरड पाहून चंचल आॅफसेट अ‍ॅन्ड सप्लायर्स या गतवर्षीच्या कंत्राटदाराला जुलै महिन्यात ५०० किलो ब्लिचिंग पावडर पुरवठा करण्यास सांगण्यात आले. त्यातील २० पोती पावडर अवघ्या ८ दिवसातच संपले. पुन्हा नागरिकांची ब्लिचिंग पावडरसाठी ओरड सुरू झाली. मागील महिनाभरापासून गोंदिया नगर परिषदेकडे ब्लिचिंग पावडर नव्हते. परंतु नागरिकांच्या सतत वाढत्या तक्रारीमुळे नगर परिषदेने आठ दिवसापूर्वी १० पोती ब्लिचिंग पावडर आणले. महिनाभराचा काळ पावसाळ्याचा होता. त्यामुळे शहरवासीयांना ब्लिचिंग पावडरची अत्यंत आवश्यकता होती. परंतु मुख्याधिकारी सुटीवर गेले. त्यामुळे स्वाक्षरी करायला कुणीही नसल्यामुळे ब्लिचिंग पावडर आणण्यात आले नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.(तालुका प्रतिनिधी)