विभागीय समितीने शोधली गोंदियात ‘स्वच्छता’

By Admin | Updated: January 8, 2015 22:56 IST2015-01-08T22:56:37+5:302015-01-08T22:56:37+5:30

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी समिती ६ जानेवारी रोजी गोंदियात आली होती. सात जणांचा समावेश असलेल्या या समितीने शहरातील विविध ठिकाणांवर

Gondiya 'cleanliness' discovered by departmental committee | विभागीय समितीने शोधली गोंदियात ‘स्वच्छता’

विभागीय समितीने शोधली गोंदियात ‘स्वच्छता’

गोंदिया : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी समिती ६ जानेवारी रोजी गोंदियात आली होती. सात जणांचा समावेश असलेल्या या समितीने शहरातील विविध ठिकाणांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र अस्वच्छतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोंदियात या समितीला स्वच्छता दिसली का? हा प्रश्न सध्या गोंदिया न.प.वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
ग्रामीण भागात स्वच्छता नांदावी व गावे स्वच्छ रहावी या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले जाते. त्याच धर्तीवर शहरी भागातही स्वच्छता नांदावी यादृष्टीने नगर परिषदेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविला जातो. सन २०१२-१३ अंतर्गत आयोजित नगर परिषद तपासणी कार्यक्रमानुसार ६ जानेवारी रोजी विभागीय तपासणी समीती शहरात दाखल झाली होती.
अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक चौकशी अधिकारी (विभागीय आयुक्त कार्यालय,नागपूर) आर.एस.सावळकर हे या समितीचे प्रमुख असून त्यांच्यासह सात जणांच्या या समितीने शहरातील कुडवा येथील वॉटर प्लांट, झोपडी मोहल्ला, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, म्युनिसिपल शाळा, इंदिरा गांधी स्टेडियम, सुभाष बगिचा, अग्नीशमन कार्यालय, मोक्षधाम आदि ठिकाणांची संबंधीत विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यां सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gondiya 'cleanliness' discovered by departmental committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.