गोंदिया जि.प.चे दुटप्पी धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:27+5:30

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे यंत्रणेला सहाय्य होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे शिक्षकांना कोविड आजाराशी संबंधित कामकाजात एप्रिल- मे महिन्यापासून अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु अधिक काळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शक्य नसले तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Gondia ZP's double standard | गोंदिया जि.प.चे दुटप्पी धोरण

गोंदिया जि.प.चे दुटप्पी धोरण

ठळक मुद्देकोविड ड्युटीतून माध्यमिकला वगळले : प्राथमिकचे शिक्षक गुंतलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविड कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घेण्याचे शासनादेश असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र प्राथमिक शिक्षक अजूनही कोविड कामात गुंतूनच आहेत.या शिक्षकांमागे कोविड कामासोबतच गृहमाला, सर्वे, गृहभेटीचा तगादा अजूनही सुरूच असल्याची बाब उजेडात आली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे यंत्रणेला सहाय्य होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे शिक्षकांना कोविड आजाराशी संबंधित कामकाजात एप्रिल- मे महिन्यापासून अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु अधिक काळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शक्य नसले तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे १७ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार कोविड आजारासंबंधीत काममाजासाठी अधिग्रहित करण्यात शिक्षकांना कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घेण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशानुसार गोंदिया जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांनी २४ ऑगस्टच्या पत्राअन्वये माध्यमिक शिक्षकांना कोविड कामातून कार्यमुक्त करून ऑनलाईन शिक्षण प्रक्रि येत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहे. एवढेच नव्हे तर ३१ आॅगस्टच्या आदेशानुसार गृहमाला उपक्र म स्थगित करून शिक्षकांनी गृहभेटी वा प्रत्यक्ष शाळेत बोलावून शिक्षण न देता आॅनलाईन शिक्षणच द्यावे असे स्पष्टपणे आदेशीत केले आहे. याच गोंदिया जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांबाबत मात्र दुटप्पीपणा केला जात आहे.जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षक अजुनही कोविड आजाराशी संबंधित कामाजात कार्यरत असून रांत्रदिवस ड्युटी करीत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमागे कंटेन्मेंट झोन मधील दिवस रात्र ड्युटीसोबतच अ‍ॅक्टिव्ह सर्वे, गृहमाला, गृहभेटीचा तगादा अद्यापही कायम आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांचे १२ ऑगस्टच्या पत्रानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमागे मागे लावलेला गृहमाला उपक्र म अजूनही सुरूच आहे. सदर उपक्र मात शिक्षकांना गृहभेट अनिवार्य असून यात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता गावातील चावडीवर प्रत्यक्ष शिक्षण देण्याचे, दर गुरुवारी गृहभेटीची माहिती, छायाचित्रे पाठविण्याचे आदेशीत आहे.

प्राथमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करा
एकीकडे माध्यमिक शिक्षकांना कोविड ड्युटी, गृहमाला,गृहभेटी यातून वगळले असताना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या दुटप्पीपणाचा कोप भोगत आहेत. शासनादेश प्राथमिक शिक्षकांना लागू नाही काय असा सवालही शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे. याकडे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवसे यांनी लक्ष देऊन प्राथमिक शिक्षकांना कोविड आजारासंबंधीत कामाकाजातून कार्यमुक्त करून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण प्रक्रि येत सामावून घेण्याची एकमुखी मागणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.

Web Title: Gondia ZP's double standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.