शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया न.प.चे कचऱ्याचे कंटेनर होताहेत भंगार

By admin | Updated: November 8, 2014 22:40 IST

कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच

गोंदिया : कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच आग लावली जाते. या कारणाने शहर परिसरातील सर्वच कंटेनर भंगार झाले आहेत. या आगीत प्लॅस्टिकचा कचराही जळत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून श्वसनाचे आजार वाढले आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी कंटेनर ठेवले आहेत. स्वच्छता कर्मचारीही या कामासाठी नेमले आहेत. काही नागरिक कचरा कंटेनरमध्ये जमा करतात तर अनेक जण कंटेनरच्या बाजूलाच कचरा फेकण्यात धन्यता मानतात. भरलेल्या कंटेनरमधील कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही अनेकदा या कंटेनरमध्येच आग लावण्यात येते. हा प्रकार शहरातील बहुतेक ठिकाणी होत असल्याने हे लोखंडी कंटेनर भंगार होत चालले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.गोंदिया हे व्यापारी शहर असल्याने येथे प्लास्टिकचा कचरा जास्त निघतो. प्लास्टिकच्या कचऱ्याचे विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठयÞा प्रमाणात होते. पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजुला घरे असतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरतो. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणेही कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या घातक पदार्थांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नागरिक ही आग आम्ही लावत नसल्याचे गळा ओरडून सांगत प्रशासनाकडे बोट दाखवतात तर परिषदेचे कर्मचारी नागरिकांकडे बोट राखवितात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही.कंटेनरच्या आसपासच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)