Gondia: विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: January 4, 2024 14:36 IST2024-01-04T14:36:35+5:302024-01-04T14:36:47+5:30
Gondia News: गोरेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत कटंगी डैम परिसरातील शेतात दोघांचा विद्युत करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. सदर घटना गुरुवार 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. यातील मृतकाचे नाव कटंगी निवासी संपत वलथरे, वय 48 वर्षे व घनश्याम वलथरे वय 32 असे आहे.

Gondia: विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू
- गोरेगांव
गोरेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत कटंगी डैम परिसरातील शेतात दोघांचा विद्युत करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. सदर घटना गुरुवार 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. यातील मृतकाचे नाव कटंगी निवासी संपत वलथरे, वय 48 वर्षे व घनश्याम वलथरे वय 32 असे आहे.
या क्षेत्रात घटनास्थळाच्या जवळ विद्युत विभागाची डिपी उघडी आहे. यातच संपत व घनश्याम हे दोघे काकेभाऊ हे अधूनमधून करंट लावून डुक्कराची शिकार करीत होते. यातील मृतकांनी कटंगी डॅम परीसरातील एका शेतात तार आणि खुट्या गाडून त्याला इलेक्ट्रीक वायर लावत असतांना विजेचा करंट लागून स्वताच्या मरणास कारणीभूत ठरल्याने फिर्यादी बुधराम आसाराम वलथरे यांच्या तक्रारी वरून गोरेगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.