गोंदियात लवकरच उड्डाणपूल व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (झेंडा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:33 IST2021-08-20T04:33:23+5:302021-08-20T04:33:23+5:30

गोंदिया : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते शहरातील जयस्तंभ चौक, सुभाष चौक, साईनगर ...

Gondia Soon Flyover and Government Engineering College (Flag) | गोंदियात लवकरच उड्डाणपूल व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (झेंडा)

गोंदियात लवकरच उड्डाणपूल व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (झेंडा)

गोंदिया : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते शहरातील जयस्तंभ चौक, सुभाष चौक, साईनगर मरारटोली, मारवाडी शाळा, राजस्थान कन्या विद्यालय, श्रीराम चौक, राजीव गांधी चौक आदींसह अन्य ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले व कित्येक वास्तू त्याची ग्वाही देतात. आता येत्या काळात गोंदिया शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व जुन्या उड्डाणपुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. याप्रसंगी धनलाल ठाकरे, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, मिथुन पटेल, माधुरी हरिणखेडे, राकेश ठाकूर, पंकज रहांगडाले, भावना कदम, सुनील केलनका, पलाश लालवानी, पारस पुरोहित, नरेंद्र चांदवानी, अमित झा, दीपक कदम, जयंत शुक्ला, योगराज रहांगडाले, सचिन मिश्रा, अजय गौर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Gondia Soon Flyover and Government Engineering College (Flag)