गोंदियातील बनावट नोटांचे कनेक्शन अकोल्यात!
By Admin | Updated: July 11, 2014 00:23 IST2014-07-11T00:23:48+5:302014-07-11T00:23:48+5:30
गोंदियातील दोन व्यापार्यांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट चलनी नोटांचे ‘कनेक्शन’ अकोल्यात असल्याचे समोर आले आहे.

गोंदियातील बनावट नोटांचे कनेक्शन अकोल्यात!
अकोला: गोंदियातील दोन व्यापार्यांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट चलनी नोटांचे ह्यकनेक्शनह्ण अकोल्यात असल्याचे समोर आले आहे. आमगाव येथील प्रल्हाद दुबे व नवीन असाटी या व्यापार्यांनी १७ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी गोंदिया पोलिसांनी त्यांना रविवारी अटक केली. त्यानंतर दुबे व असाटी यांना बनावट नोटांचा पुरवठा अकोल्यातून होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या प्रकरणी अकोल्यातील दिलीप वानखडे नामक इसमाचे नाव समोर आले आहे; मात्र हा इसम नेमका कोण आहे, कुठे राहतो, याबाबत पोलिसही अनभिज्ञ आहेत. अकोल्यात बनावट नोटा चलनात आणण्याचे काम त्याच्याच माध्यमातून होत असल्याची विश्वसनीय माहिती असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. अकोला पोलिसांनी गत २७ फेब्रुवारी रोजी अकोल्यातील गंगानगर भागातील एका बंगल्यात छापा घालून, एका महिलेसह एकूण तीन आरोपींना ४ लाख ७८ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली होती. ह्यकलर झेरॉक्सह्ण यंत्राच्या साहाय्याने बनावट चलनी नोटा तयार करण्याचे ह्यरॅकेटह्ण चालविणारा दीपक पवार नामक सफाई कामगार मात्र फरार झाला होता. काही दिवसांनंतर पोलिसांनी त्यालाही गजाआड केले. पवार त्याचा चालक, मुलगा व पुतण्याच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणण्याचे काम करीत असे, असे त्याच्या चौकशीतून पुढे आले. ही टोळी गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातही ४0 हजार रुपयांमध्ये एक लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा पुरवित होती. दीपक पवार टोळीच्या तपासादरम्यानही दिलीप वानखडे हे नाव पुढे आले होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोधही घेतला होता; मात्र कोणतेही धागेदोरे न मिळाल्यामुळे तपास रखडला. आता गोंदियातील कारवाईदरम्यान पुन्हा एकदा बनावट नोटांचे ह्यकनेक्शनह्ण अकोल्यात निघाल्याने, पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखासुद्धा याप्रकरणी तपास करणार आहे.