शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 6:03 PM

Unseasonal rains in Gondia district : हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे.

गोंदिया : मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील धानपिके संकटात आली आहे. शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील धानपिकाला आणि फळबागांना बसला आहे.

सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतातील धान कापणी करुन बांध्यामध्ये पडले आहे. या धानाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

टॅग्स :Rainपाऊस