शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त; ३५ दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 2:42 PM

गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्दे३४७ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल केल्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय आयसोलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळेच मागील ३५ दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात मदत होत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३५७ व्यक्तींचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३४७ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १० नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या