गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 10:54 IST2020-08-21T10:54:29+5:302020-08-21T10:54:48+5:30
तिरोडा-तुमसर मार्गावरील बिरसीजवळील पूल गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. यामुळे तिरोडा आणि तुमसरचा संपर्क तुटला आहे.

गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पूल गेला वाहून
ठळक मुद्देवाहतुकीचा खोळंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा-तुमसर मार्गावरील बिरसीजवळील पूल गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. यामुळे तिरोडा आणि तुमसरचा संपर्क तुटला आहे.
तर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले भरून वाहत आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता.