Gondia Agar makes 'connect' to Lange | गोंदिया आगाराने लांजीला केले ‘कनेक्ट’
गोंदिया आगाराने लांजीला केले ‘कनेक्ट’

ठळक मुद्देथेट बस फेरीची सुरूवात : मार्गावरील एकमेव फेरी, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : थेट बसफेरी नसल्यामुळे खाजगी प्रवासी वाहनांतून सुरू असलेला लांजीवासीयांचा धोक्याचा प्रवास आता संपुष्टात येणार आहे. गोंदिया आगाराने आता लांजीसाठी थेट बसफेरी सुरू केली आहे. आगाराने लांजीवासीयांना नवरात्रीची भेट दिली असून १ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज्यांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराकडून बस फेऱ्या चालविल्या जात आहेत. मध्यप्रदेश राज्यातील प्रवाशांसाठी आगाराने काही फेºया सुरू केल्या आहेत. मात्र ग्राम लांजीसाठी फेरी नसल्याने तेथील व परिसरातील जनतेची अडचण होत होती. अशात त्यांना खाजगी प्रवासी वाहनांतून धोक्याचा प्रवास करावा लागत होता. प्रवाशांनी होत असलेली अडचण लक्षात घेत गोंदिया आगाराने १ ऑक्टोबरपासून लांजीसाठी थेट बस फेरी सुरू केली.
या मार्गावरील ही एकमेव फेरी असल्याने लांजीसह परिसरातील जनतेलाही गोंदियाला ये-जा करण्याची सोय झाली आहे. दररोज सकाळी १०.३० वाजता गोंदिया आगारातून ही बस सुटणार असून दुपारी १२.३० वाजता परत येणार आहे. ही बस फेरी सुरू झाल्याने प्रवाशांना आता खाजगी प्रवासी वाहनांतील प्रवासाची जोखीम स्वीकारण्याची पाळी येणार नाही. तसेच दररोज ही फेरी असल्याने त्यांच्या कामांचा खोळंबाही होणार नाही.

मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही फेऱ्या
गोंदिया आगाराकडून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही बस फेºया चालविल्या जात असून येथील गावे ‘कनेक्ट’ आहेत. यात मध्यप्रदेश मलाजखंडसाठी दोन, बालाघाटसाठी १९, रजेगावसाठी पाच व आता लांजीसाठी एक फेरी सुरू करण्यात आली आहे. सोबतच छत्तीसगड राज्यातील डोंगरगडसाठी सुद्धा एक फेरी असून यातून प्रवाशांना सुविधा दिली जात आहे.


Web Title: Gondia Agar makes 'connect' to Lange
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.