शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यानंतर गोंदिया... पोलिसांकडून लाकडी दांड्याच्या पट्ट्यानं मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 12:18 IST

गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - जालना पोलिसांकडून व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, आता गोंदिया जिल्ह्यातही पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. 

जालन्यात शिवराज नारियलवाले (रा. जालना) यांना पोलिसांनी रानटी जनावरासारखी मारहाण केली होती. याप्रकरणी भाजपा नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले. आता, गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे. 

आमगाव तालुक्यातील आरोपी राजकुमार याला पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, पोलिसांचा IPC/CRPC वर विश्वास राहिला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  आमगाव येथील मारहाण प्रकरणातील आरोपी राजकुमार अभयकुमार यांचा 22 मे रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रथमदर्शनी तपास झाल्यानंतर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

दरम्यान, जालन्यातील शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली होती. त्यानंतर, याप्रकरणातील 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूgondiya-acगोंदियाChitra Waghचित्रा वाघ