गोंदिया @ १२.६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:12+5:30
हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे थंडी वाढल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती.

गोंदिया @ १२.६
गोंदिया: दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर बुधवारी (दि.१८) दिवसभर हुडहुडी भरली होती. त्यातच विदर्भात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली.
हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे थंडी वाढल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. थंडीत अचानक वाढ झाल्याने याचा दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.त्यातच बुधवारी विदर्भात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या मौसमातील सर्वात कमी तापमान होय. गोंदिया पाठोपाठ नागपूर १३.१ अंश सेल्सिअस, ब्रम्हपूरी १३.४, अकोला १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.थंडीत वाढ झाल्याने ऊनी कपडे घेण्यासाठी नागरिकांनी ऊनी कपड्यांच्या दुकानात गर्दी केल्याचे चित्र होते. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्या पेटवृून ऊब घेत असल्याचे चित्र होते. बुधवारी तापमानात घट झाल्याने सर्वांच्या मुखात भाऊ थंडी खूप आहे असे शब्द होते.