ते बकरी चोर दुसऱ्या गुन्ह्यात अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:38+5:302021-02-05T07:47:38+5:30
गोंदिया : जिल्ह्यातून विविध ठिकाणांवरून बकरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला. या टोळीच्या तीन ...

ते बकरी चोर दुसऱ्या गुन्ह्यात अटक ()
गोंदिया : जिल्ह्यातून विविध ठिकाणांवरून बकरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला. या टोळीच्या तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४० बकऱ्या हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर या बकरी चोरांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील राजेंद्र सुखदेवे यांच्या घरून १४ जानेवारी रोजी २०९ बकऱ्या चोरल्या होत्या. या गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली. ५५ हजार रुपये किमतीच्या बकऱ्या पळविण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यांत आरोपी शाहिल शहादत हुसेन (२१, रा. श्रीराम चौक, उडीया मोहल्ला खुशिपार, भिलाई), मिथुनकुमार श्रीरामचरण सिंग (२६, रा. बापूनगर खुशिपार, भिलाई), सोनू उर्फ राकेश ध्यानसिंग सरदार (२१, रा. बापूनगर खुशिपार, भिलाई) यांना अटक करण्यात आली. तपास नायक पोलीस शिपाई आनेश्वर बोरकर करीत आहेत.