आरोग्यसेवा आपल्या दारी पोहचविण्याचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:10 IST2018-08-23T00:09:42+5:302018-08-23T00:10:15+5:30
आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे आमचे लक्ष्य असून ते आता सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

आरोग्यसेवा आपल्या दारी पोहचविण्याचे लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे आमचे लक्ष्य असून ते आता सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
लवकरच पाच कोटी रुपयांच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार असून हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून केवळ गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जवळील ग्राम रावणवाडी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, गोंदिया तालुका आरोग्य क्षेत्रात मागासलेला होता. मात्र आम्ही रजेगाव व खमारीसह नऊ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरूवात केली. तर रजेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी शासनाकडून अतिरिक्त १०८ रूग्णवाहिका सेवेला मंजुरी मिळविली आहे. हेल्थ वेलनेस योजने अंतर्गत चिकीत्सकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्यक्षेत्रातील किमान २० नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करावी लागणार आहे. अशात आरोग्य सेवा खरोखरच आपल्या दारी येणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, क्षेत्रातील पुलांची उंची वाढविणे, मंदिर, रस्ते, कॉलेज, आरोग्य केंद्र आदि विविध कामे आमदार अग्रवाल यांच्या कार्याची ग्वाही देत असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. खंडाते, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, राजेंद्र कटरे, सूर्यप्रकाश भगत, जे.सी.तुरकर, बकाराम रहांगडाले, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, सुरज खोटेले, संतोष घरसेले, चिंतामन चौधरी, सावलराम महारवाडे, हुक ुमचंद नागपुरे, रमन लिल्हारे, गिरधारी बघेले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
५०० हून अधिक रूग्णांची आरोग्य तपासणी
या आरोग्य शिबिरात रावणवाडीसह परिसरातील ५०० हून अधिक रूग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता, कुपोषीत बाळांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक औषधांचे वितरणही शिबिरात करण्यात आले.