पोलीस पाटलांना १२ हजार रुपये मानधन द्या
By Admin | Updated: June 4, 2014 23:51 IST2014-06-04T23:51:17+5:302014-06-04T23:51:17+5:30
पोलीस पाटलांच्या मागण्या लवकर मंजूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील व गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी निवेदन दिले आहे.

पोलीस पाटलांना १२ हजार रुपये मानधन द्या
गोंदिया : पोलीस पाटलांच्या मागण्या लवकर मंजूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील व गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी निवेदन दिले आहे. पोलीस पाटलांना १२ हजार रूपये मानधन देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने दिलेल्या निवेदनात पोलीस पाटील शासनाचे सेवेत वयाचे ६0 वर्षापर्यंत काम करतो. शासकीय व्यक्ती म्हणून त्यांचेवर अनेक बंधने असतात. परंतु सेवानवृत्ती नंतर त्यांना पेन्शन देण्यात येत नाही. सेवानवृत्त वृध्द व्यक्तीला कोणत्याच प्रकारची मदत न करणे हे मानवाधिकाराचे उल्लंघन असून सेवानवृत्त पोलीस पाटलांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी किंवा एकमुस्त २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. महागाई वाढल्याने कार्यरत पोलीस पाटलांना १२ हजार रुपये मानधन देण्यात यावे. आजपर्यंंत नक्षलग्रस्त भागातील ४२ पोलीस पाटलांची हत्या करण्यात आली. त्यांना शहीद घोषीत करून त्यांच्या वारसानांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी. नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांना अधिकचे मानधन देण्यात यावे. तसेच ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरूस्ती करण्यात यावी, पोलीस पाटील पदाचे नुतनीकरण कायम स्वरूपी बंद करण्यात यावे. त्यांच्या वारसानांना पोलीस पाटील भर्तीमध्ये अतिरीक्त १0 गुण देण्यात यावे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यपाल पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा. इत्यादी मागण्यासंदर्भात संघटनेच्या राज्यव्यापी नागपूर अधिवेशनामध्ये गृहमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ठराव मंजूर करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंंत झालेली नाही. म्हणून संघटनेच्या पदाधिकार्यासोबत शासनाने बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात असे आवाहन पोलीस पाटील संघटनेने केले आहे.
मागण्या मंजूर करण्याची कृपा करावी, राज्यातील सेवानवृत्त पोलीस पाटलांनां दरमहा २000 रूपये पेंशन देण्यात यावी, किंवा एकमुस्त २ लाख रुपये देण्यात यावे, सेवानवृत्तीचे वय ६0 वरून ६५ करण्यात यावे, पोलीस पाटलांना दरमहा १२000 हजार रूपये मानधन देण्यात यावे, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांना अधिकचे मानधन देण्यात यावे, नक्षलवाद्यांनी ठार केलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत देण्यात यावे, ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरूस्ती करण्यात यावी, पोलीस पाटील पदाचे नुतनीकरण कायम स्वरूपी बंद करण्यात यावे, पोलीस पाटलांच्या वारसांनाना पोलीस पाटील भरर्तीमध्ये अनुभवाच्या आधारावर १0 अतिरीक्त गुण देण्यात यावे, यावर्षी राज्यपाल पुरस्काराचे आयोजन करून पोलीस पाटलांना पुरस्कार देण्यात यावे, पोलीस पाटलांचा विमा काढण्यात यावा, मंजूर असलेला प्रवास भत्ता व २ वर्षाची रक्कम त्वरीत देण्यात यावी, पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यात यावे, पोलीस पाटील भर्तीवरील बंदी त्वरीत उठवावी, अशी मागणी राज्यउपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष सोमाजी शेंडे, मनोहरसिंह चव्हाण, आनंद तुरकर, कुंजीलाल भगत, साहेबराव बन्सोड, दिलीप मेश्राम, मधुकर पर्वते, श्रीराम झिंगरे, भांडारकर पाटील, कवळू हलमारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)