हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:41 IST2017-08-27T20:41:24+5:302017-08-27T20:41:43+5:30

बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते.

Give placements to other places for deleted stores | हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या

हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या

ठळक मुद्देहटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी त्वरित दुकानांचे गाळे देण्यात यावे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते. ते दुकान हटविण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी त्वरित दुकानांचे गाळे देण्यात यावे, अशी मागणी सदर दुकानदारांसह बसपाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनानुसार, कार्यकारी अभियंता (रोहयो) कार्यालयातील अधिकारी चव्हाण यांनी पदाचा दुरूपयोग करून बेरोजगारांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यांचे स्वयंरोजगाराचे साधन शासकीय यंत्रणेद्वारे उद्वस्त करण्यात आले. त्यामुळे मध्य प्रदेशात ये-जा करणाºया नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. याच परिसरात शासनाने नवीन गाळे तयार करून त्या दुकानदारांना दिले तर त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येवू शकेल व बेरोजगारीची समस्या सुटू शकेले.
यासाठी बहुजन समाज पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बहुजन समाज पक्षाचे नेते सोनू दास, कार्यकर्ते रोहीत भारद्वाज, विशाल खंडारे, कृष्णा फरकुंडे, राजा मेश्राम, शुभम हुमणे, अतदीप मेश्राम, रितीक मेश्राम, शैलेश नांदगाये, अतुल बडोले, लोकेश भेंडारकर, जितू गजभिये, सौरभ बागडे, पप्पू नागदेवे तसेच दुकानदार मुनमुन गुप्ता, रोहीत राणा, लीमराह वसीम, सीनू श्रीनिवास आदी उपस्थित होते.

Web Title: Give placements to other places for deleted stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.