शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी घरात शिरल्याने दोन गटांत मारहाण

By admin | Updated: March 18, 2017 01:47 IST

गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव येथील मनोज चचाने याची प्रेयसी त्याच्या घरात घुसल्याने त्याचे ज्या मुलीशी लग्न जुळले होते

नवीन नाते वांद्यात : बोरगाव येथील घटना गोरेगाव : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव येथील मनोज चचाने याची प्रेयसी त्याच्या घरात घुसल्याने त्याचे ज्या मुलीशी लग्न जुळले होते त्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या घरी येऊन गोंधळ घातला. परिणामी दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना गुरुवारच्या सकाळी १०.३० वाजता घडली. या संदर्भात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव तालुक्याच्या बोरगाव येथील आरोपी मनोज हेमराज चचाने याचे लग्न चिचगावटोला येथील एका मुलीशी जुळले होते. परंतु त्याचे प्रेमसंबंध दुसऱ्या मुलीशी होते. ती मुलगी त्याच्या घरात घुसली. ही माहिती मनोजची सोयरीक झालेल्या लोकांना माहित पडल्यावर ते लोक बोरगाव येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता आले. यात दोन्ही गटात हाणामारी झाली. विनोद सोनवाने (२७) रा.चिचगाव यांच्या तक्रारीवरुन आरोपी मनोज हेमराज चचाने (२१), सुरेंद्र चरण पटले (२९), देवेंद्र बाबुलाल राऊत (३०), पुस्तकला शामा राऊत (३३) व सुग्रता चरण पटले (४५) रा. बोरगाव यांच्यावर भादंविच्या कलम १४३,१४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर सुरेंद्र चरण पटले (२९) यांच्या तक्रारीवरुन आरोपी विनोद मुन्नीलाल सोनवाने (२७), मनोज प्रेमलाल सोनवाने (२८), कन्हैया सोमा पटले (३२). गुणीलाल चुन्नीलाल सोनवाने, रेखा गुणीलाल सोनवाने (४५) सर्व रा. चिचगावटोला यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना काठ्यांनी मारले.