शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

गाव तंटामुक्त करण्यासाठी घ्यावे लागतील १५0 गुण

By admin | Updated: May 27, 2014 23:50 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबवितांना प्रत्येक पैलूवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तंटे सोडविण्याबरोबर इतर बाबीकडे लक्ष दिल्याशिवाय गाव तंटामुक्त होणार नाही. आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबवितांना प्रत्येक पैलूवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तंटे सोडविण्याबरोबर इतर बाबीकडे लक्ष दिल्याशिवाय गाव तंटामुक्त होणार नाही. आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी २00 पैकी १५0 गुण घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या गावांचे कसे मुल्यमापन करावे यासंदर्भात शासनाने १४ ऑगस्ट २00८ च्या शासन निर्णयात या संदर्भात सर्व माहिती दिली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या समित्यांना पाच प्रकारच्या नोंदवह्या अद्यावत ठेवायच्या असतात. त्यापैकी तीन नोंदवह्यांना माहितीचा दस्तावेज असतो. यात नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपयायोजना, नोंदवही क्र.२ अ, नोंदवही क्र.३ अ चे गुणदान केले जाते.ईतर दोन नोंदवह्या क्र.२ ब व ३ ब मध्ये माहिती नमूद करायची असते. नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपय योजनेकरीता ८0 गुण देण्यात आले आहेत. यापैकी गाव पात्र करण्यासाठी किमान ५६ गुण घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेत गावात राबविलेल्या उपक्रमांची नोंद घेतलेली असते. नोंदवही २ अ करीता १00 गुण देण्यात आले आहेत. यापैकी तंटामुक्त गाव होण्यासाठी किमान ७0 गुण घेणे आवश्यक आहे. ३0 सप्टेंबर पर्यंत अदखलपात्र तंटे, तडजोड योग्य गुन्ह्यांची नोंद घेणे आवश्यक असते. नोंदवही ३ अ करीता २0 गुण आहेत.यातील किमान १४ गुण घेणे आवश्यक आहे. सदर नोंदवहीत १ ऑक्टोबर ते ३0 एप्रिल दरम्यान असलेल्या अदखलपात्र व तडजोड योग्य गुन्ह्यांची नोंद घेणे आवशञयक असते. नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, नोंदवही २ अ, ३ अ यांच्या किंमान गुणांची बेरीज अनुक्रमे ५६, ७0 १४ अशी १४0 येत असली तरी गाव तंटामुक्त होण्यासाठी २00 पैकी किमान १५0 गुण घेणे आवश्यक आहे. तंटामुक्त गाव मोहीमेच्या स्पर्धेत उतरलेल्या तंटामुक्त गावांचे आंतर जिल्हा मुल्यमापन ५ जून ते ५ जुलै तर बाह्य जिल्हा मुल्यमापनाचा कालावधी १८ जुलै ते १५ ऑगस्ट करण्यात येणार आहे. या संदर्भात २0 ऑगस्टपुर्वी मुल्यमापन अहवाल संबधित पोलीस अधिक्षकांना सोपविण्यात येणार आहे.

नोंदवही २ ब मध्ये ३0 सप्टेंबर पर्यंतचे बिगर तडजोडीच्या गुन्ह्यांची नोंद केलेली नसते अश्या नोंदवह्यांना गुण दिलेले नाहीत. नोंदवही ३ ब मध्ये १ ऑक्टोबर ते ३0 एप्रिल दरम्यान बिगर तडजोडीच्या गुन्ह्यांची नोंद केलेली असते. या नोंदवहीलाही गुण देण्यात आले नाही. गठित करण्यात आलेल्या समितीला मुल्यमापनाची जाण असावी यासाठी २९ मे रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)