शालेय कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:16+5:30
जुलै २०२१ नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के वाढीव महागाई भत्त्याच्या दराने रजा रोखीकरण देयक मंजूर करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा अग्रीम व अंतिम परतावा त्वरित देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी अंतिम परताव्याचे प्रकरण सादर करताना हमीपत्र बीटीआर व भविष्य निर्वाह निधी विवरण पत्राची सत्यप्रत लावण्याची अट शिथिल करण्यात यावी तसेच ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलै ची वेतनवाढ लावून सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

शालेय कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर निकाली काढा
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यातील शिक्षण संस्था व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या निकाली काढा, अशी मागणी करीत शिक्षक भारती मुख्याध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, अनेक शाळांची संचमान्यता दुरुस्ती करून प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे, शाळेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती, बदली प्रस्ताव, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरण, सेवानिवृत्ती प्रकरण, वर्धित मान्यता वाढीव विद्यार्थी परवानगी मंडळ मान्यता इत्यादी शाळेने आपल्या कार्यालयात सादर केलेली विविध प्रकरणे निकाली करण्यासंबंधी कालावधी निश्चित करण्यात यावा, कर्मचाऱ्यांना वर्ष २०२०-२१ च्या भविष्य निर्वाह निधी पावत्या अविलंब वितरित करण्यात याव्या, जानेवारी २०२० नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ३ टक्के व ५ टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्यात यावी, जुलै २०२१ नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के वाढीव महागाई भत्त्याच्या दराने रजा रोखीकरण देयक मंजूर करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा अग्रीम व अंतिम परतावा त्वरित देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी अंतिम परताव्याचे प्रकरण सादर करताना हमीपत्र बीटीआर व भविष्य निर्वाह निधी विवरण पत्राची सत्यप्रत लावण्याची अट शिथिल करण्यात यावी तसेच ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलै ची वेतनवाढ लावून सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना शिक्षक भारती मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह टी. एस. गौतम, अध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, उपाध्यक्ष अनिल मंत्री, शिक्षक उपप्रमुख डी. एम. टेंभरे आदी उपस्थित होते.