गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:22 IST2018-12-30T00:21:13+5:302018-12-30T00:22:04+5:30

येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले.

Gas Cylinder blast burned home | गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक

गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक

ठळक मुद्देजीवित हानी टळली : शेख कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि.२९) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने काही क्षणातच उग्र रुप धारणे केले.शहरातील नागरिकांनी याची माहिती गोंदिया व तिरोडा येथील अग्निशमन दलाला दिली. तसेच अदानी विद्युत प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाची सुध्दा मदत घेण्यात आली. तब्बल एक ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने शेख कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. आगीमुळे असीम शेख यांचा हात जळाला. आगीमुळे मात्र दोन्ही भावांचे संसार उघड्यावर आले आहे. दोन्ही कुटुंब फक्त अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडल्याने बचावले. विशेष म्हणजे तिरोडा नगर परिषद अग्निशमन दलाची गाडी सुमारे दीड ते दोन तास उशिराने घटनास्थळी पोहोचली.
अदानी प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाने ही आटोक्यात आणण्यात आली. तिरोडा न.प.अग्निशमन दलाच्या बेजवाबदार कारभाराबद्दल शहरवासीयांनी रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आ.विजय रहांगडाले, तहसीलदार संजय रामटेके, पोलीस निरीक्षक कैलास गवते, माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी घटनास्थळी भेट दिली. आ.रहांगडाले यांनी शेख कुुटुंबीयांचे सात्वन करुन विमा कंपनीकडून व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

Web Title: Gas Cylinder blast burned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.