विवाहयोग्य अनाथ मुलीला दिले गॅस कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:48 IST2019-03-03T00:47:25+5:302019-03-03T00:48:22+5:30

जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून बसलेल्या ग्राम सोमलपूर येथील ज्योती घनशाम ठाकरे या विवाहयोग्य असलेल्या अनाथ मुलीला अर्जुनी-मोरगाव येथील इंडेन गॅसचे संचालक चांडक बंधू यांनी क्षणात प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मंजुर करुन तिला शेगडी व गॅस हंडा सुपूर्द केला.

Gas connections given to a married orphan girl | विवाहयोग्य अनाथ मुलीला दिले गॅस कनेक्शन

विवाहयोग्य अनाथ मुलीला दिले गॅस कनेक्शन

ठळक मुद्देइंडेन गॅसचे दायित्व : लग्नकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून बसलेल्या ग्राम सोमलपूर येथील ज्योती घनशाम ठाकरे या विवाहयोग्य असलेल्या अनाथ मुलीला अर्जुनी-मोरगाव येथील इंडेन गॅसचे संचालक चांडक बंधू यांनी क्षणात प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मंजुर करुन तिला शेगडी व गॅस हंडा सुपूर्द केला.
हसण्या बागडण्याच्या वयामध्ये ज्योती व कुणाली या दोघा बहिणींचे काही वर्षापूर्वी कृपाछत्र हिरावून गेले. मायबापाविना पोरक्या झालेल्या दोघा बहिणी ग्राम मांडोखाल येथील आपल्या मामाकडे राहतात. अनाथ झालेल्या या दोघा बहिणींना सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता प्रा. सविता बेदरकर सर्वोतोपरी मदत करीत आहे. ज्योतीचे एप्रिल महिन्यात लग्न होऊ घातले आहे. तिच्या वैवाहिक जिवनात आवश्यक असलेले साहित्य भेट स्वरुपात समाजसेवी दानदात्यांकडून मिळण्यासाठी ठवरे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
सासरी गेल्यावर तिला स्वयंपाकासाठी उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी इंडेन गॅसचे संचालक चांडक बंधू यांना केली.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर इंडेन गॅसचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे व संदीप पंधरे यांनी अल्पावधीतच नवीन गॅस कनेक्शन मंजूर करुन दिले. अनाथ मुलीला हातभार लावण्याच्या सामाजिक बांधीलकीच्या हेतूने आवश्यक रकमेचा भरणा कर्मचाऱ्यांनी स्वत: केला. ज्योतीला गॅस कनेक्शन दयावंता वालदे, सुप्रिया गजभिये, भूमिका शेंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यांचीही मदत होणार
ज्योतीच्या विवाहाप्रसंगी एस.एस.जे. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. कल्पना सांगोळे यांच्याकडून गोदरेज कपाट, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तुळशीकर यांच्याकडून कुलर, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सोनदास गणवीर यांनी जर्मन रॅक भेट देण्यासाठी तयारी दर्शविली. समाज सेविंनी अनाथ मुलीला संसारोपयोगी साहित्य भेट देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ठवरे यांनी केले आहे.

Web Title: Gas connections given to a married orphan girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.