गंगाझरी ठाण्यात विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल
By Admin | Updated: December 30, 2014 23:38 IST2014-12-30T23:38:25+5:302014-12-30T23:38:25+5:30
जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस उपविभागांतर्गत गंगाझरी पोलीस ठाण्यात जानेवारी ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याअखेर विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गंगाझरी ठाण्यात विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल
काचेवानी : जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस उपविभागांतर्गत गंगाझरी पोलीस ठाण्यात जानेवारी ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याअखेर विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सन २०१३ या मागील वर्षात डिसेंबर अखेर ८१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी ८ गुन्हे अधिकचे दाखल झाले आहेत.
दाखल झालेल्या गुन्ह्यांत अपघाती मृत्यूचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. दुखापतीच्या गुन्ह्यात दुप्पट (२०) वाढ झाली आहे. खुनाचे चार प्रकरण घडले तर दरोडा आणि जबरी चोरी घडून आली नाही. चोरीच्या प्रमाणातही मागच्या तुलनेत कमी दिसून येत आहे.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ३६ गावांचा समावेश आहे. जानेवरी ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ठाण्यात चार खुनाच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली. चार गुन्हे घडले आणि चारही गुन्हे उघड झाले आहेत.
सन २०१४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचे तीन प्रकरण दाखल झाले. यापैकी दोन उघड झाले तर एकाचा तपास सुरू आहे. अतिप्रसंगाचे प्रमाण कमी झाले आहे. विनयभंगाच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. याच या वर्षात एकूण सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सन २०१४ मध्ये अपघाती मृत्यूंची संख्या फारच कमी असून केवळ तीन घटना आहेत. मागील वर्षात नऊ अपघाती मृत्यूचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दुखापतीचे यावर्षी सर्वाधिक ३० गुन्हे दाखल झाले असून यात मागील पाच गुन्ह्यांच्या समावेश आहे. चालू वर्षात २१ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. दरोडा आणि जबरी चोरी झाली नसून मागील वर्षी प्रत्येकी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. रात्रीच्या घरफोडीचे चार गुन्हे दाखल असून एकूण चोरीचे १६ गुन्हे दाखल झाले आहेत. कलम ३७९ व ३८० अन्वये १२ तक्रारी दाखल झाल्या असून फक्त तीन गुन्हे उघड झाले आहेत.
या व्यतीरिक्त यावर्षी जनावर चोरी, विश्वासघात, अपक्रिया प्रत्येकी एक आणि शेतकरी सामान चोरीचे तीन, धोकेबाजी व दंगा यांचे प्रत्येकी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंगाझरी पोलीस ठाण्यात अपराधीक ८९ गुन्ह्यांची नोंद या वर्षाच्या २२ डिसेंबरपर्यंत झाली. जुगार व अपहरणाचे प्रत्येकी दोन आणि दारूबंदीचे ८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मागील प्रकरण कोणतेही प्रलंबित नसून एक प्रकरण उघड करण्यात आले आहे. ठाण्यांतर्गत गावात दारूबंदी, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकडे येत्या नवीन वर्षात आपले प्राधान्य असेल, असे ठाणेदार सुरेश कदम यांनी सांगितले. ग्रामपंचायत व मंगातंमुस पदाधिकाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)