गांधीटोला प्रथम तर भजेपार द्वितीय

By Admin | Updated: March 30, 2015 01:07 IST2015-03-30T01:07:55+5:302015-03-30T01:07:55+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ‘गावची शाळा, आमची शाळा’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत वर्ग ९ ते ७ च्या गटातील निकाल घोषित झाला.

Gandhi Tola first, Bhajepar II | गांधीटोला प्रथम तर भजेपार द्वितीय

गांधीटोला प्रथम तर भजेपार द्वितीय

साखरीटोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ‘गावची शाळा, आमची शाळा’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत वर्ग ९ ते ७ च्या गटातील निकाल घोषित झाला. त्यात कारुटोला प्रभागात जिल परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गांधीटोला प्रथम तर जिल्हा परिषद शाळा भजेपार द्वितीय क्रमांकाच्या पुस्कारास पात्र ठरले आहेत.
मुल्यांकन करणाऱ्या पथकाने सदर शाळांच्या गुणवत्ताबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा गांधीटोला येथील सरपंच रेखा फुंडे, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, शाळा समितीच्या अध्यक्षा गायत्री खरवडे, संतोष मेंढे, पोलीस पाटील रामेश्वर फुंडे, माजी सभापती तुकाराम बोहरे, टी.जी. फुंडे, मुख्याध्यापक आर.एल. सांगोडे, नाखले, कावळे, ठाकरे, त्रिवेणी कटरे, मुख्याध्यापक आर.ए. बहेकार, एच.सी. पारधी, बिसेन, डी.बी. दहीकर, व्ही.एस. यादव, निखाडे, कुराहे,शाळा समितीचे अध्यक्ष किसना बहेकार, सुभाष ब्राह्मणकर, महेश चुटे, राखी बहेकार, शीला तुरकने, सारिका बहेकार, कल्पना बहेकार, भरत फुंडे यांनी सहकार्य केले.
शिवाय आमगाव/खुर्द प्रभागात जिल्हा परिषद शाळा ंिबंझली प्रथम, जिल्हा परिषद शाळा तिरखेडी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तर पिपरीया प्रभागात जिल्हा परिषद शाळा विचारपूर प्रथम तर जिल्हा परिषद शाळा बाकलसर्रा द्वितीय क्रमांकास पात्र ठरले. झालीया प्रभागातून जिल्हा परिषद शाळा लटोरी प्रथम व जिल्हा परिषद शाळा झालीया द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारास पात्र ठरले. (वार्ताहर)

Web Title: Gandhi Tola first, Bhajepar II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.