शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चुकारे व बोनसचे आले १९१ कोटी रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत जिल्ह्यात हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केली जाते.गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपये बोनस आणि प्रती क्विंटल दोनशे रुपये प्रोत्साहान अनुदान असे एकूण ७०० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत दिला जाणार होता.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : खरिपाची अडचण दूर होण्यास मदत,सोमवारपासून होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे बोनसचे १०० कोटी रुपये फेडरेशनकडे थकले होते.य् ाापैकी शासनाने शुक्रवारी (दि.१९) ५६ कोटी रुपये दिले असून उर्वरित ४४ कोटी रुपये येत्या आठवडाभरात मिळणार असल्याची माहिती आहे. रब्बी हंगामात खरेदी केलेल्या धानाच्या १७० कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांपैकी १३४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी दिला असून शेतकऱ्यांची खरिपाची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत जिल्ह्यात हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केली जाते.गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपये बोनस आणि प्रती क्विंटल दोनशे रुपये प्रोत्साहान अनुदान असे एकूण ७०० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत दिला जाणार होता.खरीप हंगामात जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर ३० लाख क्विंटल धानाची विक्री केली होती. ९३ हजार शेतकऱ्यांना बोनसचे एकूण १९३ कोटी रुपये देणे होते.यापैकी ९३ कोटी रुपयांचा निधी शासनाने यापूर्वीच दिला. तर १०० कोटी रुपयांचा निधी मागील सात महिन्यापासून थकला होता.मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा शासनाच्या विविध महसुली उत्पन्नांवर परिणाम झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत सुध्दा ठणठणाट होता. परिणामी बोनसचा निधी प्राप्त होण्यास विलंब होत होता.मात्र सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना पेरणी आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज होती. पण त्यांना बोनस आणि चुकाऱ्याची रक्कम न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली होती.अखेर राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या बोनसपैकी ५६ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी(दि.१९) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करुन दिला आहे. तर उर्वरित ४४ कोटी रुपयांचा निधी सुध्दा आठवडाभरात देण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.रब्बीतील चुकाऱ्यांचा मार्ग मोकळाजिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामात आतापर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर एकूण १० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र खरेदी केलेल्या धानाचे १७० कोटी रुपयांचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याने त्यांची यासाठी ओरड वाढली होती. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. याचीच दखल घेत शासनाने आता चुकाऱ्यांसाठी १३४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी (दि.१९) उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आता रब्बीतील चुकाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी