पोस्ट ऑफीसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:07+5:30

अत्यावश्यक कामांसाठी शासनाने नागरिकांना घराबाहेर निघण्याची सोय दिली असून यासाठी जीवनावश्यक वस्तू व बँका तसेच पोस्ट ऑफीसलाही ‘लॉकडाऊन’ मधून वगळले आहे. मात्र येथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन अपेक्षीत आहे. त्यानुसार, येथील पोस्ट ऑफीसचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा मात्र नागरिकांकडून फज्जा होत आहे. कार्यालयाच्या मुख्य द्वारात नागरिकांची एकच गर्दी दिसून येते.

The fuss of 'social distance' in the post office | पोस्ट ऑफीसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

पोस्ट ऑफीसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

ठळक मुद्देअंतर न ठेवता नागरिकांची गर्दी : कार्यालयाने खबरदारी घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकांच्या सोयीसाठी शासनाकडून जीवनावश्यक वस्तू व बँका तसेच पोस्ट ऑफीसला ‘लॉकडाऊन’मध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र येथील पोस्ट ऑफीसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होत आहे.
नागरिकांची सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी बघावयास मिळत आहे. अशात मात्र कार्यालयाकडून खबरदारी घेऊन नागरिकांत सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सुरक्षित अंतर व स्वच्छता हे दोनच रामबाण उपाय सध्यातरी दिसून येत आहेत. हेच कारण आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून त्यावर मात करण्यासाठी शासनाने देशात ‘लॉकडाऊन’ केला आहे.
यांतर्गत लोकांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे.जेणेकरून नागरिक एकमेकांच्या संपर्कात येणार नाही व कोरोनाचा विषाणू पसरणार नाही. मात्र अत्यावश्यक कामांसाठी शासनाने नागरिकांना घराबाहेर निघण्याची सोय दिली असून यासाठी जीवनावश्यक वस्तू व बँका तसेच पोस्ट ऑफीसलाही ‘लॉकडाऊन’ मधून वगळले आहे. मात्र येथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन अपेक्षीत आहे. त्यानुसार, येथील पोस्ट ऑफीसचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा मात्र नागरिकांकडून फज्जा होत आहे. कार्यालयाच्या मुख्य द्वारात नागरिकांची एकच गर्दी दिसून येते.
विशेष म्हणजे, सुरक्षित अंतरावर नागरिकांनी उभे राहून टप्प्या टप्याने आपले काम करवून घेणे अपेक्षीत आहे. मात्र येथे उलटच कारभार सुरू असून ‘सोशल डिस्टन्सिंग’ला धुडकावून काम चालत आहे.

हात धुवायला डेटॉलचे पाणी
पोस्ट ऑफीसमध्ये शिरताच एक व्यक्ती डेटॉलचे पाणी हात स्वच्छ करण्यासाठी देतो.सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयाचा हा प्रयोग चांगला आहे. मात्र पुढे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांची रांग लागत असून त्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जात नाही. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला याबाबत विचारले असता त्याने नागरिक ऐकत नसल्याचे उत्तर देत आपली बाजू सारुन दिली. मात्र हा प्रकार धोक्याची घंटा असून हात धुणे जेवढे गरजेचे आहे. तेवढेच सुरक्षित अंतर पाळण्यासाठी कार्यालयाकडून व्यवस्था करणे हे सुद्धा त्यापेक्षा जास्त गरजेचे आहे.

नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे यासाठी सुरक्षित अंतरावर सर्कल बनविण्यात आले आहेत. ग्रीन नेट खरेदी केली असून त्यांच्या थांबण्यासाठीची व पाण्याची व्यवस्थ केली आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ची काटेकोरपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी शहर पोलीस ठाण्यात पत्र देऊन एक पोलीस कर्मचारी मागीतला आहे.
सहदेव सातपुते
- सह.पोस्ट मास्तर

Web Title: The fuss of 'social distance' in the post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.