शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शांततेत पार पडला अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 24, 2014 23:41 IST

जिवन- मृत्यूच्या लढय़ात अखेर मृत्यूचा विजय झाला व २३ मे रोजी संजय खोब्रागडे यांनी अंतिम श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) ग्राम कवलेवाडा येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान

खोब्रागडे यांना निरोप : पोलिसांचा चोख बंदोबस्त

गोंदिया : जिवन- मृत्यूच्या लढय़ात अखेर मृत्यूचा विजय झाला व २३ मे रोजी संजय खोब्रागडे यांनी अंतिम श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) ग्राम कवलेवाडा येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

१६ मे रोजी मध्यरात्री संजय खोब्रागडे यांना झोपेतच जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. तेव्हापासून सुरू असलेली खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज अखेर २३ मे रोजी संपली.

शनिवारी (दि.२४) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने दुपारी ३ वाजता गंगाझरी पोलिसांनी मृत संजयच्या पत्नी देवकाबाई यांना त्यांच्या गावी आणले होते. तर दुपारी ३.३0 वाजता दरम्यान संजयचा मृतदेह गावात दाखल झाला. संजयचा मृतदेह प्रथम त्यांच्या घरी ठेवण्यात आला व काही वेळाने ज्या जागेसाठी हा वाद सुरू आहे त्याठिकाणी नेण्यात आला.

पश्‍चात तेथूनच अंत्ययात्रेला सुरूवात झाली. गावातील मोक्षधाम येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान संजय खोब्रागडे यांच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.

अतिशय शांतीपूर्ण वातावरणात हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. अंत्यसंस्काराला गावासह गोंदियातूनही मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. यात शुद्धोधन शहारे, विनोद नांदूरकर, अशोक बोरकर, यशपाल डोंगरे, सतीश बंसोड, राहू राहुलकर, रतन वासनिकसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

विशेष म्हणजे याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)