दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:01 IST2019-07-08T22:01:20+5:302019-07-08T22:01:37+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणम फुके यांनी येथे दिली.

दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणम फुके यांनी येथे दिली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये प्राविण्य प्राप्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, माजी जि.प.सदस्य राजेश चतुर, माजी न. प. सदस्य घनश्याम पानतावणे उपस्थित होते.
फुके म्हणाले, दिव्यांग मुलांना शिक्षण व समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांनाही आत्मसन्मानाने जगता यावे व एक समाजाचा घटक म्हणून दिव्यांगांना योग्य स्थान मिळावे, यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले. जि. प. समाज कल्याण विभागातंर्गत दिव्यांगांना तीनचाकी सायकली वाटप करण्यात येतात. हा एक स्तुत्य उपक्रम असून यामुळे दिव्यांगांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणार आहे. एक दिव्यांग शासनाच्या योजनापासून वंचित राहणार यासाठी पूरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी दहावी व बारावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ईशा बिसेन, प्राची बन्सोड, आरती मटले, विनोद बरडे, स्नेहा वाघमारे, अमीत बघेले, जुनेद तुरक, अक्षय भगत, रामेश्वर राऊत, रिना शहारे, पुनीत पटले, रोहन रंगारी, लक्ष्मी जुगनाहके,दर्शना थेर, प्रशांत उपराडे, निलेश्वर रकशे, निलम मेश्राम, आदित्य वलथरे, एस.जितेंद्र दोडानी यांचा समावेश आहे. एकूण २३१ विद्यार्थ्यांपैकी १७७ दिव्यांग विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
जि.प.समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन दिलीप बघेले यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी आर.आर.हिवारे यांनी मानले.