चिंचेचे फळ होतेय कवडीमोल
By Admin | Updated: March 22, 2015 00:48 IST2015-03-22T00:48:15+5:302015-03-22T00:48:15+5:30
दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत.

चिंचेचे फळ होतेय कवडीमोल
काचेवानी : दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी चिंचीचे झाड ज्यांच्या घरी आहे त्याला सर्व संपन्न असणारा कुटुंब समजत असत मात्र आता चिंचीचे झाडे आणि कवडीमोलाचे झाले असून नाहिसे होत आहे आहेत.
वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात चिंचीच्या पिकाला आवड नसली तरी दक्षिण भारतीयांच्या लगत असणारे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आजही चिंच लोकप्रिय आहे. चिंचीचे फळ प्रत्येक दिवशी जेवणात विविध प्रकारच्या स्वरुपात व्यंजन म्हणून उपयोगात आणतात. त्यामुळे या पिकाची मागणी दक्षिण भारतीय राज्यात भरपूर प्रमाणात होत असते.
महाराष्ट्र राज्यातसुद्धा पूर्वीपेक्षा वर्तमानमध्ये चिंचीच्या फळाला महत्व येवू लागले आहे. चटणी चाटमसाला, पाणिपुरी सारख्या आहारात याचा उपयोग वाढत आहे, असे असले तरी आजच्या घडीला स्थानिक व्यापारी किंवा व्यसायी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणी पासून तर विक्रीला तयार करण्यापर्यंत खर्च अधिक लागतो आणि त्यानुसार बाजारात पडक्या दरात विक्री करावी लागते.
दुर्लक्षित पणामुळे कोणताही व्यक्ति चिंचीचे झाडे स्वत:हून जगवण्यास तयार नाही. चिंचीचे नैसर्गिक रित्या जगले ते जगले अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्न देणाऱ्या चिंचीच्या झाडाकडे अशा प्रकारचे दुर्लक्ष करणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
चिंचीच्या एका झाडापासून ५ ते १० हजाराचे उत्पन्न मिळते. तरी देखेली चिंचीच्या पिकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता फळाला तोडण्याकरीता झाडावर कोणीही चढण्यास तयार होत नाही. त्याच बरोबर फळाला तोडल्यानंतर टरफल काढणे फोडून बिया काढणे हे कामे परवडण्यासारखे नसल्याने याकडे स्थानिक व्यापारी किंवा व्यवसाय करणारे दुर्ल िकरत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागात असलेले चिंचीचे उत्पन्न कवडीमोलात विक्री केले जातात. तर चालु दशकात चिंचीचे पिक घेण्याकरीता कोणतेही व्यापारी ईच्छुक दिसून येत नाही.
शासनाने नुकसानभरपाई द्यावी
शेतात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. नैसर्गिक अपदेतुन नुकसान झाली तर त्याची पाहणी करुन पंचनामा तयार केला जातो. व नुकसान भरपाई आखली जाते. आंबे, चिंच हे सुद्धा किमती व गरजेचे फळ असल्याने नैसर्गिक आपदामध्ये याची गणना करुन अशा मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी व जनप्रतिनिधी यांनी शासना समक्ष पाठपुरावा करावा अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.