धम्मरूपी वृक्षाची फळे चाखावी
By Admin | Updated: October 23, 2016 01:51 IST2016-10-23T01:51:48+5:302016-10-23T01:51:48+5:30
बाबासाहेबांच्या धम्म दिक्षेमुळेच भारतात बुद्ध धम्माचे वृक्ष पुनर्जिवीत होऊन पल्लवीत झाले.

धम्मरूपी वृक्षाची फळे चाखावी
शैलेंद्र टेंभूर्णीकर : बिरसी येथे धम्म प्रवर्तन दिन साजरा
आमगाव : बाबासाहेबांच्या धम्म दिक्षेमुळेच भारतात बुद्ध धम्माचे वृक्ष पुनर्जिवीत होऊन पल्लवीत झाले. या धम्मरूपी वृक्षाची समता, स्वातंत्र्य, बंधूत्व, न्यायाची फळे चाखून प्रगतीपथावर आरूढ व्हावे असे प्रतिपादन प्रबोधनकार शैलेंद्र टेंभूर्णिकर यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बिरसी येथील नागार्जुन बुद्ध विहार समितीच्यावतीने आयोजीत ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रल्हाद चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्यारेलाल जांभूळकर, पुरूषोत्तम वासनीक, बिगलाल भोयर, मंगल इळपाते, रमेश नागरीकर, प्रमीला नागरीकर, पुष्पा सोयाम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नवल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत चौधरी, कमल भावे, सुरेश चौधरी, गीता वासनीक, कुसूम चौधरी, आशा भावे व समाजबांधवांनी सहकार्य केले.
अर्पण बहुउद्देशीय संस्था
गोंदिया : येथील अर्पण बहुउद्देशीय सामाजीक संस्थेच्यावतीने ६० व्या धम्म प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष अरूण बन्नाटे, राहूल अंबादे, स्वप्नेश कोहळे, सचिव अमित डोंगरे, स्वराज टेंभूर्णिकर, गणेश राऊत व अन्य उपस्थित होते.
पंचशील बुद्धविहार
मुंडीपार : येथील पंचशील बुद्ध विहार येथे ६० वा धम्मचक्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लहान मुलांची गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान वालदे, शहारे व शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन विनोद जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक व उपासिकांनी सहकार्य केले.