“तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणून मैत्रिणीने दिली मित्राला हाताची नस कापण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 21:14 IST2021-09-30T21:13:36+5:302021-09-30T21:14:07+5:30
Gondia News २६ वर्षांच्या तरुणीने गोंदिया येथील सागर विजयसिंह चव्हाण (२६) या तरुणाला “तू माझ्याशी बोलत का नाही? तू जर माझ्याशी बोलला नाही, तर मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करीन,” अशी धमकी दिली.

“तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणून मैत्रिणीने दिली मित्राला हाताची नस कापण्याची धमकी
गोंदिया : शहराच्या जयस्तंभ चौकात २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता गौतमनगरातील २६ वर्षांच्या तरुणीने गुरुनानक वाॅर्ड, गोंदिया येथील सागर विजयसिंह चव्हाण (२६) या तरुणाला “तू माझ्याशी बोलत का नाही? तू जर माझ्याशी बोलला नाही, तर मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करीन,” अशी धमकी दिली. सागर चव्हाणसोबत त्या २६ वर्षांच्या तरुणीचे मैत्रीचे संबंध होते. परंतु १५ दिवसांपासून त्या दोघांचे पटत नसल्यामुळे बोलणे बंद होते. तो तिच्यासोबत फोनवर बोलत नव्हता म्हणून तिने चक्क सागर चव्हाणला धमकी दिली. सागरने या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिसात दिली. पोलिसांनी त्या तरुणीवर भादंविचे कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.