चाकूने भोसकून मित्राने केला मित्राचा खून

By नरेश रहिले | Updated: May 24, 2024 11:14 IST2024-05-24T11:12:55+5:302024-05-24T11:14:18+5:30

जितेश चौक छोटा गोंदिया येथे घडली.

friend killed a friend by stabbing him with a knife  | चाकूने भोसकून मित्राने केला मित्राचा खून

चाकूने भोसकून मित्राने केला मित्राचा खून

नरेश रहिले, गोंदिया: शहराच्या छोट्या गोंदियाच्या शास्त्री वार्डातील राहूल दिलीप बिसेन (२२) या तरुणाचा त्याच्याच मित्राने धारदार चाकूने भोसकून खून केला. ही घटना २३ मे रात्री ११:३० ते १२ वाजताच्या सुमारास जितेश चौक छोटा गोंदिया येथे घडली.

गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोट्या गोंदियाच्या जितेश चौकात २३ मे च्या रात्री ११:३० वाजताच्या सुमारास आरोपी व मृतक हे दोघेही असताना त्या दोघांत कुठल्यातरी कारणावरून त्यांचा वाद झाला. या वादात आरोपी प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (२३) रा. जितेश चौक छोटा गोंदिया याने राहुल दिलीप (२२) रा. शास्त्री वार्ड छोटा गोंदिया याच्या पोटावर, छातीवर, शरीरावर धारदार चाकूने मारून त्याचा खून केला.

या घटने संदर्भात मृतकाचे वडील दिलीप जीवनलाल बिसेन (४५) रा. मनोहर म्युनिसिपल जवळ शास्त्री वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयर विरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांनी भेट दिली. आरोपी फरार असून आरोपीच्या शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: friend killed a friend by stabbing him with a knife