रेतीची वाहतूक करणारे चौदा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:17 IST2017-08-27T21:08:40+5:302017-08-27T21:17:10+5:30
बनावट रॉयल्टीवर रेतीची वाहतूक करणाºया चौदा आरोपींना चांदूररेल्वे पोलिसांनी रविवारी कारवाई करीत अटक केली आहे.

रेतीची वाहतूक करणारे चौदा आरोपी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : बनावट रॉयल्टीवर रेतीची वाहतूक करणाºया चौदा आरोपींना चांदूररेल्वे पोलिसांनी रविवारी कारवाई करीत अटक केली आहे. त्यांच्याजवळून चार ट्रक, जेसीबी व पोकलँड जप्त करण्यात आला.
बासलापूर मार्गे अमरावतीकडे येणाºया एम.टी.जी.५६७६ क्रमांकाच्या ट्रकमधून रेतीची वाहतूक केली जात होती. ट्रकचालक राजू संभाजी काळे याच्याजवळील कागदपत्रांची तपासणी केली असता रेतीची रॉयल्टी बनावट असल्याचे आढळून आले. यात रेतीचे ठिकाण व निघण्याची वेळ वेगवेगळी आढळून आली. यावरून रेती भरण्याच्या ठिकाणावर गेले असता येथे चार ट्रक, जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरू असल्याचे दिसून आले. यावरून चांदूररेल्वे पोलिसांनी कारवाई करीत सर्व वाहने जप्त केली व चौदा जणांना अटक केली. आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ४१९, ४६८, ४७१ व पर्यावरण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी ३७९/३४ व ९(१५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा शेळके करीत आहे.