शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: September 25, 2014 23:24 IST

दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या

नवरात्रौत्सवात वाढीव डबे : गोंदिया-सिकंदराबाद सुपरफास्ट सुरूगोंदिया : दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व गाड्यांचा लाभ गोंदियावासीयांना होणार आहे. मुंबई-हावडा-मुंबई (०२०४१/०२०४२) ही गाडी चार दिवस भुसावळ, नागपूर, गोंदिया व बिलासपूरमार्गे धावणार आहे. ही गाडी मुंबईवरून मंगळवारी दुपारी १.३० वाजता, २१ व २८ आॅक्टोबर तसेच ४ व ११ नोव्हेंबरला सुटणार आहे. ही गाडी हावडा येथे बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजता, दि. २३ व ३० आॅक्टोबर तसेच ६ व १३ नोव्हेंबरला सुटून मुंबईला शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. मुंबई-हावडा (०२०८३/०२०८४) ही गाडी मुंबईवरून दि.२१ व २८ आॅक्टोबर तसेच दि.४ व ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून दि.२२ व २९ आॅक्टोबर तसेच ५ व १२ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही गाडी मुंबई येथे गुरूवारी दुपारी १.५० वाजता पोहोचेल. ही गाडी चार दिवस धावणार असून कल्याण, भुसावळ, नागपूर, गोंदिया व बिलासपूर असा या गाडीचा मार्ग राहणार आहे.बिलासपूर-पूणे-बिलासपूर (०८२९५/०८२९६) ही गाडी सात दिवस राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, बिलासपूरमार्गे धावणार आहे. ही गाडी बिलासपूरवरून दि.३० सप्टेंबर, ७, १४, २१, २८ आॅक्टोबर तसेच ४ व ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. पुणे येथे बुधवारी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. आपल्या परतीच्या प्रवासासाठी पुणेवरून दि.१, ८, १०, २२, २९ आॅक्टोबर, तसेच ५ व १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटणार आहे. प्रिमियम स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनल -हावडा (०२२४१/०२२४२) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन दि.२३ व ३० सप्टेंबर रोजी दुपारी १.२० वाजता सुटेल व हावडा येथे बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी हावडावरून २५ सप्टेंबर व २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल आणि शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पोहोचेल. ही गाडी दोन दिवस भुसावळ-नागपूर व बिलासपूरमार्गे धावणार आहे.