शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने लोटूनही मजुरांना मजुरी नाही

By admin | Updated: June 2, 2014 01:27 IST

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. तालुक्यात

कालीमाटी : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. तालुक्यात चार हजारावर मजुर कामावर आहेत, पण महिने लोटूनही मजुरी मिळत नसल्याने कामे जवाहर विहीरींचे काम थंडबस्त्यात आहे.

आमगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर अनेक प्रकारचे कामे सुरू आहेत. या योजनेपासून अकुशल मजुरांना रोजगार मिळावा म्हणून सदर योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक हाताला काम तर मिळाले पण प्रश्न मजुरीचा योजना चांगली आहे पण राबविणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांना येणार्‍या तांत्रीक अडचणी यामुळे महिने लोटून जातात पण मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा करीत नाही. यामुळे मजुर वर्गालाही पोट भरणे अवघड झाले आहे. मात्र प्रशासनाला ही दयनिय अवस्था दिसत नाही. कालीमाटी येथील ग्रा.पं. न खाजगी विंधन विहिरी चे कामे सुरू केले. पण तीन ते चार महिने लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. गरजू मजूर दररोज आपले बँक खाते तपासून घेतात. पण मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम अद्याप जमा झाली नसल्याचे मजुरांना सांगितले. त्यामुळे पुढील विहिरीचे कामे बंद करण्यात आले. सध्या पावसाळा सुरू होत असल्याने सदर विहीर बुझण्याचा मार्गावर आहे. त्या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विंधन विहिरीसंबंधीचे मस्टर पंचायत समितीकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आली पण बँकिंग प्रणालीमुळे मजुरांचे पेमेंट मिळण्यास विलंब होत असल्याचे विस्तार अधिकारी खोटेले यांनी सांगितले.

विकासमुखी रोहयोच्या या योजनेत मजुरी या प्रश्नांनी बारा वाजविले आहे. या योजनेतील बँकीग व्यवहार जिल्हास्तरावर प्रलंबित आहे ते तत्काळ निवारण करण्याची मागणी लक्ष्मण चौधरी, पुरूषोत्तम हरिणखेडे, शकुंतला चौधरी, महेंद्र चौधरी, देवका फुंडे, कैलास चौधरी, चंद्रशेखर फुंडे, तेजराम बहेकार, भोजू बहेकार यांनी केली आहे. (वार्ताहर)