लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच तिने कवटाळले मृत्यूला

By Admin | Updated: February 4, 2017 01:31 IST2017-02-04T01:31:15+5:302017-02-04T01:31:15+5:30

तिरोडा तालुक्याच्या मुरमाडी येथील रेशमा बळीराम तुमसरे (१९) या युवतीचे लग्न ६ फेब्रुवारीला तुमसर

Four days before the wedding, she died a poisonous death | लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच तिने कवटाळले मृत्यूला

लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच तिने कवटाळले मृत्यूला

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या मुरमाडी येथील रेशमा बळीराम तुमसरे (१९) या युवतीचे लग्न ६ फेब्रुवारीला तुमसर तालुक्याच्या देव्हाडी येथील युवकाशी पसरवाडा येथे होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात होणार होते. मात्र सदर युवतीने लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच गुरूवारी (दि.२) विष घेवून आत्महत्या केली.
या प्रकाराबाबत तपास अधिकारी पोलीस हवालदार मडावी यांचा संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लग्नाच्या चार दिवसांपूर्वी सदर मुलगी उलट्या करीत असल्याचे तिच्या आईला आढळले. दरम्यान तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिरोडा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी घेतलेल्या तपासात व बयानात तिच्या आई-वडिलांनी सांगितले की, मुलगी लग्नाला तयार होती. तिने कधीच नकार दिला नाही. त्यामुळे लग्न ठरवून पत्रिकासुद्धा छापण्यात आल्या होत्या. तसेच आंदणाचे सामान-साहित्यसुद्धा घेवून झाले होते. मात्र तिने विष का घेतले, हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे मुलीच्या घरात कुठेही कीटनाशक ठेवल्याचे आढळले नाही.

Web Title: Four days before the wedding, she died a poisonous death